दुचाकीच्या डिक्कीतून ९६ हजार रुपये लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:56 PM2021-06-09T21:56:06+5:302021-06-09T21:56:21+5:30

गोरख वामन पाटील (रा . वाघरे ता .पारोळा)  हे बुधवारी दुपारी स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी गेले. परंतु तिथे गर्दी असल्याने त्यांनी सोबत आणलेली  ९६ हजाराची रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली

Lampas worth Rs 96,000 from two-wheeler trunk in jalgaon | दुचाकीच्या डिक्कीतून ९६ हजार रुपये लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद

दुचाकीच्या डिक्कीतून ९६ हजार रुपये लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद

googlenewsNext

पारोळा जि. जळगाव :  बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ९६ हजार लंपास करण्यात आले. ही  घटना बाजारपेठेतील किल्ल्याजवळ बुधवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास घडली. यातील चोरटा सीसीटीव्ही कैद झाला आहे. 

गोरख वामन पाटील (रा . वाघरे ता .पारोळा)  हे बुधवारी दुपारी स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी गेले. परंतु तिथे गर्दी असल्याने त्यांनी सोबत आणलेली  ९६ हजाराची रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. यानंतर ते  किल्ल्याजवळील एका दुकानात खरेदीसाठी गेले. त्याचवेळी चोरट्याने संधी साधत डिक्कीतून  ९६ हजाराची रक्कम लंपास केली. पाटील हे बॅंकेत गेल्यावर डिक्की उघडली असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Lampas worth Rs 96,000 from two-wheeler trunk in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.