घरमालकाने 30 भाडेकरूंकडे भाड्याच्या बदल्यात केली शारीरिक संबंधाची मागणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:47 PM2022-12-24T12:47:31+5:302022-12-24T12:47:46+5:30

Crime News : प्रोसिक्यूटरने सांगितलं की, घरमालक तीन डझनांपेक्षा जास्त सेक्स चार्जेसमध्ये दोषी आढळला आहे.

Landlord indicted for demanding favors from 30 tenants have to pay 37 crore rupees in settlement | घरमालकाने 30 भाडेकरूंकडे भाड्याच्या बदल्यात केली शारीरिक संबंधाची मागणी आणि मग...

घरमालकाने 30 भाडेकरूंकडे भाड्याच्या बदल्यात केली शारीरिक संबंधाची मागणी आणि मग...

googlenewsNext

Crime News : एका घरमालकाला राहण्याची जागा देण्याच्या बदल्यात सेक्सची मागणी करण्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. घरमालकाने ही मागणी 30 भाडेकरूंकडे केली होती. असं सांगण्यात येत आहे की, यातील सगळेच भाडेकरू कमी पगारावर काम करत होते. प्रोसिक्यूटरने सांगितलं की, घरमालक तीन डझनांपेक्षा जास्त सेक्स चार्जेसमध्ये दोषी आढळला आहे.

ही घटना अमेरिकेतील न्यू जर्सीची आहे. माउंटेनसाइड नावाच्या ठिकाणी राहणारा 75 वर्षीय जोसेफ सेंटानीने 42 गुन्हे केले. 21 डिसेंबरला यूनियन काउंटी प्रोसिक्यूटरच्या ऑफिसकडून सांगण्यात आलं की, यातील 23 गुन्हे सेकंड डिग्री सेक्शुअल असॉल्टचे आहेत आणि 19 गुन्हे फोर्थ-डिग्री क्रिमिनल सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहेत.

एलिजाबेथ शहरात जोसेफच्या 18 लो-इनकम रेसिडेंशिअल रेंटल इस्टेट आहे. जोसेफने 2013 ते 2020 दरम्यान 22 ते 61 वयाच्या पुरूष आणि महिलांना सेक्सच्या बदल्यात रेंट कमी करण्याची ऑफर दिली होती. 

जोसेफला जून 2021 मध्ये अटक केली गेली होती. पण तो कोर्टाच्या आदेशानुसार बाहेर आला होता. नंतर एक वर्षाआधी जस्टिस डिपार्टमेंटने जोसेफला याप्रकरणी साधारण 37 कोटी रूपये दंड ठोठावला होता.

जोसेफने त्याची संपत्ती विकून हा दंड भरला होता. त्याच्यावर घर खरेदी करण्यासाठी बंदी घलण्यात आली होती. तेव्हा जोसेफने त्याच्यावरील आरोप मान्य करण्यास नकार दिला होता. नंतर विभागाने जोसेफकडून भरण्यात आलेला 37 कोटी रूपयांचा दंड पीडितांमध्ये वाटण्यात आला होता.

Web Title: Landlord indicted for demanding favors from 30 tenants have to pay 37 crore rupees in settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.