रांका ज्वेलर्सचे लुटलेले दागिने रायगडवाडीतून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:42 AM2018-08-04T01:42:28+5:302018-08-04T01:42:38+5:30

पुण्याच्या रांका ज्वेलर्सचे हिरे आणि दागिने मुंबईतून पुण्यात घेऊन येणाऱ्या कर्मचाºयांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचा बनाव करणारा रांका ज्वेलर्सचाच कर्मचारीच या लुटीतील खरा सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

 Lankan jewelery stolen from Ranga Jewelers seized from Raigadwadi | रांका ज्वेलर्सचे लुटलेले दागिने रायगडवाडीतून जप्त

रांका ज्वेलर्सचे लुटलेले दागिने रायगडवाडीतून जप्त

Next

महाड : पुण्याच्या रांका ज्वेलर्सचे हिरे आणि दागिने मुंबईतून पुण्यात घेऊन येणाऱ्या कर्मचाºयांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचा बनाव करणारा रांका ज्वेलर्सचाच कर्मचारीच या लुटीतील खरा सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पुणे क्राइम ब्रँचच्या पथकाने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीतून हा सर्व लुटलेला ऐवज जप्त केला.
रांका ज्वेलर्सचे दागिने आणि हिरे मुंबईतून पुण्यात आणण्याची कामगिरी ज्वेलर्सचा कर्मचारी अजय होगाडेवर सोपवली होती. हे दागिने स्टेशनवर उतरल्यावर चोरट्यांनी चोरल्याचा बनाव होगाडेने रचला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पुणे क्राइम ब्रँचने या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. अजय यामागचा खरा सूत्रधार असल्याचा संशय अधिकाºयांना आला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आपले वडील, भाऊ आणि मित्राच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली त्याने दिली.
अजय मुंबईतून दागिने घेऊन पुण्यात येत असताना त्याचा भाऊ शरद आणि मित्र अनुपकुमार सोबतच होते. पुणे स्टेशनवर उतरून ते दागिने घेऊन मुंबईत शरदचे वडील मारुती यांच्याकडे गेले. मारुती दागिने घेऊन रायगड किल्ला पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत आले. टकमक टोकाच्या खाली असलेल्या त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये खड्डा खणून त्या खड्ड्यात हे दागिने लपवून ठेवले.
तिघांनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेत दागिने हस्तगत केले. जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये दीड किलो गॅ्रम वजनाचे सोन्याचे दागिने, प्लॅटिनम आणि हिºयांचे नेकलेस असा दीड कोटी रुपयांचा ऐवज आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. होगाडे कुटुंबावर १२ लाखांचे कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी ही लूट केल्याचे अजयने सांगितले.

Web Title:  Lankan jewelery stolen from Ranga Jewelers seized from Raigadwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं