पत्नीवर चाकू हल्ला प्रकरणी लासुरच्या आरोपीस ७ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:13 PM2020-08-13T20:13:16+5:302020-08-13T20:14:43+5:30
चोपडा तालुक्यातील लासुर येथील अनिल आधार भिल व त्याची पत्नी सुनंदा यांच्यात वाद असल्याने सुनंदा वराड ता. चोपडा येथे तिच्या माहेरी राहत होती.
अमळनेर (जि. जळगाव) : पत्नीच्या पोटावर चाकू हल्ला करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चोपडा तालुक्यातील लासुर येथील आरोपीस अमळनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा तालुक्यातील लासुर येथील अनिल आधार भिल व त्याची पत्नी सुनंदा यांच्यात वाद असल्याने सुनंदा वराड ता. चोपडा येथे तिच्या माहेरी राहत होती. तिच्या नातलगाच्या मुलाचे लग्न असल्याने ९ एप्रिल २०१८ रोजी लासुर येथे आली होती. यावेळी ही घटना घडली. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी यात १३ साक्षीदार तपासले त्यात आरोपी अनिलचा भाऊ व मेव्हणे तसेच डॉ. देसले व डॉ. निलेश देवराज यांची साक्ष महत्वाची ठरली. न्या राजीव पी पांडे यांनी अनिलला भा. दं. वि. कलम ३०४ (२) प्रमाणे ७ वषार्ची शिक्षा व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास ६ महिने अधिक शिक्षा भोगावी लागेल.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी