Aryan Khan Arrest Update: ड्रग्स सेवनाबाबत असा आहे भारतातील कायदा, दोषी आढळल्यास एवढी होऊ शकते शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:04 PM2021-10-04T14:04:08+5:302021-10-04T14:04:58+5:30

Aryan Khan Arrest Update: आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकऱणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच तो सध्या नाकरोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या ताब्यात आहे.

This is the law in India regarding drug use, if found guilty, this is the punishment | Aryan Khan Arrest Update: ड्रग्स सेवनाबाबत असा आहे भारतातील कायदा, दोषी आढळल्यास एवढी होऊ शकते शिक्षा 

Aryan Khan Arrest Update: ड्रग्स सेवनाबाबत असा आहे भारतातील कायदा, दोषी आढळल्यास एवढी होऊ शकते शिक्षा 

Next

मुंबई - आलिशान जहाजावरील ड्रग्स पार्टीप्रकऱणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच तो सध्या नाकरोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या ताब्यात आहे. (Aryan Khan Arrest Update) या प्रकरणामुळे भारतातील अंमली पदार्थांबाबतचा कायदा आणि त्यामधील शिक्षेच्या तरतुदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. भारतामध्ये अंमली पदार्थांचे सेवन हा गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र तुम्ही कधी आणि कुठला अंमली पदार्थ सेवन करता. कधीपासून अंमली पदार्थांचे सेवन करता याचा कोर्ट शिक्षा देण्यापूर्वी विचार करते. भारतात अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत काय कायदा आहे आणि कशाप्रकारे व किती शिक्षा होऊ शकते याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात. 

काय आहे अँटी ड्रग्स कायदा
नारकोटीक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटेंट अॅक्ट म्हणजेच एनडीपीएस अॅक्ट १९८५ आणि एनडीपीएस अॅक्ट १९८८ हे भारतात लागू असलेले दोन मुख्य कायदे आहेत. या कायद्यांनुसार नारकोटिक्स ड्रग्स किंवा कुठल्याही नियंत्रित केमिकल किंवा सायकोट्रॉपिक पदार्थ बनवणे, जवळ बाळगणे, विकणे, खरेदी करणे, त्यांचा व्यापार आणि आयात-निर्यात करणे हे गुन्हा ठरते. केवळ मेडिकल किंवा शास्त्रीय कारणांसाठी विशेष मान्यतेनंतर ड्रग्सचा वापर शक्य आहे.   हे निर्बंध तोडणाऱ्या व्यक्तीविरोधात शोधमोहीम, जप्ती आणि अटकेचे अधिकार एनडीपीएस अॅक्ट देतो. तपास यंत्रणा या प्रकरणांमध्ये खासगी किंवा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करू शकतात.

ड्रग्सबाबत भारतात काय आहे धोरण 
भारतीय राज्यघटनेमध्ये कलम ४७ अन्वये राज्याला ड्रग्स नियंत्रणासाठी अधिकार दिलेले आहेत. ड्रग्स नियंत्रणांतर्गत ३ श्रेणींमध्ये ड्रग्सची चर्चा सध्याच्या कायद्यामध्ये आहे. १ - एलएसडी, मॅथसारखे सायकोट्रॉपिक पदार्थ, २- चरस, गांजा, अफीमसारखे नारकोटिक्स पदार्थ, ३- मादक पदार्थांचे केमिकल मिश्रित पदार्थ, ज्यांना कंट्रोल सब्सटेंट म्हणतात. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झाल्यास किमान १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

कोकेनपासून गांजापर्यंत २२५ पेक्षा अधिक सायकोट्रॉपिक आणि ड्रग्सच्या यादीत आहेत. हे अंमली पदार्थ एनडीपीएस अॅक्ट अन्वये प्रतिबंधित आहेत. या पदार्थांच्या कुठल्याही प्रकारच्या मिश्रणाला जर तुम्ही जवळ ठेवले, वापर केला. किंवा कुठल्याही प्रकारे याचा व्यापार केला. तर तुमच्याकडून कायद्याचा भंग होऊ शकतो. हा गुन्हा समजला जाऊ शकतो. त्यासाठी शिक्षा होऊ शकते. मात्र कायद्याचा कितपत भंग झाला आहे यावरून शिक्षा सुनावली जाऊ शकते.

एनडीपीएस कायद्यांतर्गत ड्रस सापडल्यास शिक्षा ही आरोपीकडे किती प्रमाणात ड्रग्स सापडला यावरून निश्चित होईल अशी तरतूद २००८ मध्ये करण्यात आली. म्हणजेच एक किलोपेक्षा कमी ड्रग्स सापडल्यास तुम्हाला व्यावसायिक समजले जाणार नाही. खासगी वापरासाठी ड्रग्स सापडल्यास १० वर्षांचा कारावास तर व्यावसायिक प्रमाणात ड्रग्स सापडल्यास २० वर्षांपर्यंतच्या सक्त शिक्षेची तरतूद आहे.

मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीमध्ये बदल केला आहे. आता ड्रग्सच्या प्रमाणावरून शिक्षा ठरणार नाही तर प्रकरणाचे गांभीर्य आणि सेवन करणाऱ्याचा हेतू पाहून किमान १० आणि कमाल २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच किमान १ लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.  काही गंभीर प्रकरणात न्यायालय ड्रग्सच्या व्यावसायिकाला स्वविवेकाने मृत्युदंडाची शिक्षा सुनाऊ शकते. देश-विदेशात अनेकदा अशी शिक्षा सुनावली गेली आहे.

जर तुमच्याकडे ड्रग्स सापडला तर स्थानिक पोलिसांपासून अनेक एजन्सी यामध्ये दखल देऊ शकतात. बहुतांश प्रकरणात स्थानिक पोलिसच ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांना किंवा व्यापार करणाऱ्यांना पकडत असतात. 

Web Title: This is the law in India regarding drug use, if found guilty, this is the punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.