Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 13:12 IST2024-11-20T13:11:37+5:302024-11-20T13:12:19+5:30
Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला होता.

Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स गँगचे जवळपास ७०० शूटर्स आहेत आणि ते देशभरात पसरले आहेत. लॉरेन्स बिश्नोई याच्याशी संबंधित काही खास गोष्टी त्याच्या वकील रजनी यांनी उघड केल्या आहेत.
आज तक रेडिओवरील मुलाखतीदरम्यान वकील रजनी यांनी सांगितलं की, लॉरेन्स बिश्नोई याला जेव्हा तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तेव्हा आठवड्यातून एकदा त्याच्याशी भेट व्हायची. सलमान खानने बिश्नोई समाजाच्या प्रसिद्ध मुक्तिधाम मुकाम मंदिरात जाऊन पश्चात्ताप करावा अशी लॉरेन्स बिश्नोईची इच्छा आहे. लॉरेन्स रोज सकाळी १०८ वेळा सूर्यनमस्कार करतो, त्याच्या दिवसाची सुरुवात पूजेने होते.
"ही आत्महत्या नसून हत्या होती"
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी अनुज थापनच्या मृत्यूबाबत वकिलाने मोठा दावा केला आहे. त्यांनी झोपण्यासाठी दिलेल्या चटईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे असं म्हटलं.
पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याची हत्या विकी मिड्दुखेडा याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती का?, असा प्रश्न वकील रजनी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं की, विकी मिड्दुखेडा कॉलेजमध्ये लॉरेन्सचा सीनिअर होता, विकी मिड्दुखेडा याने २०११ मध्ये लॉरेन्सला SOPU चे पुढील अध्यक्ष म्हणून घोषित केलं होतं.
वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
लॉरेन्स बिश्नोईच्या वागण्याबाबत वकिलाने सांगितलं की, जर तुम्ही त्याच्याशी मोठ्या आवाजात बोललात तर तो पुढे तुमच्यावर ओरडणार नाही, तो तुमचं ऐकेल. लॉरेन्स बिश्नोईने जेव्हा मला सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा मी देखील प्रभावित झाले होते.
वकील रजनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीही लॉरेन्स बिश्नोईच्या चाहत्या आहेत. दोन मुलींनी स्वतःला लॉरेन्स बिश्नोईच्या फॅन म्हणून घोषित केलं आहे. लॉरेन्स बिश्नोईला भेटण्यासाठी त्या कोर्टातही पोहोचल्या होत्या. त्यांनी मला लॉरेन्स बिश्नोईशी भेटण्याची विनंतीही केली होती.