ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:03 PM2020-06-12T15:03:55+5:302020-06-12T15:07:07+5:30
कारागृहातून आला आणि मित्राची हत्या केली, दोन कुख्यात गुंडांना अटक
नागपूर - नुकताच कारागृहातून जमिनीवर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. सुरेंद्र सुखदेव तभाने (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कलवा उर्फ दीपक सोनी आणि बाबा पण्णी अशी आहेत हे दोघेही गुंड आहेत. ते कोरोनामुळे नुकतेच कारागृहातुन बाहेर आले आणि त्यांनी गुन्हेगारी सुरू केली. दारू पिताना सुरेंद्र याने आरोपी कलवा याला ले साले दारू पी... असे म्हणून त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतली. कलवा याने शिवीगाळ केल्यामुळे पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्याचा धाक दाखविला. त्यामुळे कलवा आणि पन्नीने सुरेंद्रची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
सुरेंद्र तभाने हा शांतीनगरात राहत होता. तो गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन समोसा चिवडा विकायचा शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच साईबाबा नगरात आरोपी राहतात. सुरेंद्र याची आरोपी दीपक सोनी तसेच बाबा पन्नीसोबत मैत्री होती. ते नेहमी एकत्र बसून दारू प्यायचे. नेहमीप्रमाणे आज दुपारी एकच्या सुमारास सुरेंद्र तसेच आरोपी कलवा आणि बाबा हे तिघे दारू पीत बसले. ते पाहून सुरेंद्रचा मोठा भाऊ नरेंद्र याने या तिघांना हटकले. घरासमोरदारू पीत बसने योग्य नाही, लहान मुले बघतात, असे म्हणून त्यांना येथून जाण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी सुरेंद्रला जबरदस्तीने बाजूला असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेले आणि दारू पीत बसले. काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दारू पिता पिताच आरोपीने सुरेंद्रच्या डोक्यावर हातोडा आणि दगडाने मारणे सुरू केले. ते पाहून बाजूला खेळणारी मुले आरडाओरड करत तभाने यांच्या घरी आली. त्यांनी नरेंद्र यांना तुझ्या भावाला आरोपी कलवा आणि बाबा पण्णी हातोड्याने मारत असल्याचे सांगितले. त्यामुळे नरेंद्र धावतच गेले. त्याने कलवा याला पकडून दोन ठोसे लगावले. त्याच्या हातून हातोडा हिसकावून घेतला. त्यामुळे कलवाने चाकू काढला मात्र नरेंद्रने प्रतिकार केल्यामुळे आरोपी कलवा तसेच बाबा पनी दोघेही तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेंद्रला त्याच्या भावाने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचीत पडून होता. त्यामुळे नरेंद्र शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. सुरेंद्रला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
परिसरात थरार
भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. पोलिसांनी नरेंद्र चव्हाण यांची तक्रार नोंद घेत आरोपी कलवा उर्फ दीपक सोनी असेच बाबा पन्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला
Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही