बघू कशी होते धक्काबुक्की! लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्याचे खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 05:29 PM2018-09-21T17:29:02+5:302018-09-21T17:30:15+5:30
हिंगोलीच्या उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी फेसबुकद्वारे पुढच्या वर्षी स्वेच्छेने लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यात बंदोबस्त घेणार म्हणजे घेणारच. बघू कशी होते धक्काबुक्की आणि वादविवाद अशी पोस्ट करून खुले आव्हान पाटील यांनी दिले. हिंगोलीच्या उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी फेसबुकद्वारे पुढच्या वर्षी स्वेच्छेने लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यात बंदोबस्त घेणार म्हणजे घेणारच. बघू कशी होते धक्काबुक्की आणि वादविवाद अशी पोस्ट करून खुले आव्हान पाटील यांनी दिले.
मुंबई - लालबागचा राजा मंडळात कार्यकर्त्यांचा मुजोरपणा दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रत्यय यंदा देखील आला. नुकतेच पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना काही मुजोरखोर कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेबाबत संबंध समाजात संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच हिंगोलीच्या उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी फेसबुकद्वारे पुढच्या वर्षी स्वेच्छेने लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यात बंदोबस्त घेणार म्हणजे घेणारच. बघू कशी होते धक्काबुक्की आणि वादविवाद अशी पोस्ट करून खुले आव्हान पाटील यांनी दिले.
लालबागच्या राजाविषयी खूप श्रद्धा आहे माझ्या मनात, मुंबईकरांचे श्रद्धास्थान आहे ते. मी देखील मुंबईत पोलीस दलात कार्यरत असताना राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी मला देखील कार्यकर्त्यांनी उर्मटपणे हटकले होते. त्यावेळी खूप वाईट वाटले होते. देवाच्या दरबारी ही अशी वागणूक मिळते. स्त्रियांना तर कसेही लोटले जाते असे सुजाता पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. आता तर आयपीएस अधिकाऱ्याचा सन्मान कारण्याऐवजी त्यांना अशी अपमानास्पद वागणूक देणं गैर आहे. म्हणून मी पुढल्या वर्षी स्वत: राजाच्या ठिकाणी स्वेच्छेने बंदोबस्तासाठी परवानगी घेणार आणि येणार असल्याचे पाटील यांनी पुढे सांगितले.