बांग्लादेशी प्रवाशाचे वाचविले जीआरपीच्या जवानांनी प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:51 PM2018-08-20T19:51:36+5:302018-08-20T19:58:01+5:30
शनिवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी जलद लोकल दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पोचली. ही लोकल थांबण्यापूर्वीच हमीद जेवल (वय २१) हा प्रवासी चालू गाडीतून विरुद्ध दिशेने उतरत असताना फलाटावर पडून लोकल खाली पडला.
मुंबई - दादर मध्य रेल्वे स्थानकात बांग्लादेशाचा नागरिक प्रवास करत असताना धावत्या लोकलमधून उतरत असताना पडला. तो लोकल खाली जात असताना कर्तव्यावर तैनात असलेल्या जीआरपीच्या जवानांनी त्याचा जीव वाचवला. जखमी अवस्थेत त्याला शीव रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ही घटना फलाट क्रमांक ४ वर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शनिवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी जलद लोकल दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पोचली. ही लोकल थांबण्यापूर्वीच हमीद जेवल (वय २१) हा प्रवासी चालू गाडीतून विरुद्ध दिशेने उतरत असताना फलाटावर पडून लोकल खाली पडला. फलाटावर गस्त करीत असलेले जीआरपी जवानांच्या ही बाब लक्षात आली. पोलीस हवालदार मगरे, हवालदार शिंदे आणि पोलिस शिपाई तापोळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकल गाडी खाली जात असलेल्या हमीदला बाहेर फलाटावर खेचून त्याचा जीव वाचवला. हमीदच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद दादर रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी हा परदेशी नागरीक असल्याचे त्याच्याजवळ असलेल्या पासपोर्ट आणि व्हीजावरून कळाले. जखमी प्रवेशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करीत आहेत.