मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 05:44 PM2019-10-23T17:44:45+5:302019-10-23T17:45:30+5:30

मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

life-imprisonment for the accused in Prafull Patil Murder case | मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप

मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप

googlenewsNext

मीरारोड -  मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी  विशाल चंद्रकांत म्हात्रे, राजेश जिलेदार सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय आणि गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांची 2010 मध्ये हत्या झाली होती. 

  प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणातील विशाल म्हात्रे, राजेश जिलेदार सिंग, अजय पांडे, गुलाम रसूल शेख या चौघाही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले होते. न्यायाधीश जयस्वाल यांनी मंगळवारी आरोपींना दोषी ठरवताना बुधावारी शिक्षा सुनवणार असल्याचे म्हटले होते.

 या खटल्याचे सरकारी वकील राजा ठाकरे तर तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे आहेत. पाटील यांच्यावर २ गोळ्या झाडून 28 वार केले होते. विशाल म्हात्रे याने जागेच्या वादातून राजेश सिंगला सुपारी दिली होती. राजेश सिंग हा भाईंदरचे भाजपा नगरसेवक श्रीप्रकाश उर्फ मुन्ना  सिंग यांचा सख्खा भाऊ आहे. आरोपी विशाल म्हात्रे हा त्यावेळी महापौर असलेले काँग्रेसच्या तुळशीदास म्हात्रे यांचा पुतण्या आहे.

Web Title: life-imprisonment for the accused in Prafull Patil Murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.