पत्नीची हत्या करणाऱ्याला पतीला जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: August 19, 2023 04:40 PM2023-08-19T16:40:40+5:302023-08-19T16:41:06+5:30
उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या अभयप्रताप सिंग याने त्याची पत्नी प्रतिमा उर्फ गुडियाची फेब्रुवारी २०१७ मध्ये चाकूने वार करत हत्या केली होती.
कल्याण : पत्नीची हत्या करणाऱ्या पती अभयप्रताप सिंग रुद्रप्रताप सिंग याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या अभयप्रताप सिंग याने त्याची पत्नी प्रतिमा उर्फ गुडियाची फेब्रुवारी २०१७ मध्ये चाकूने वार करत हत्या केली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पत्नीची हत्या करणाऱ्या पती अभयप्रतापला पोलिसांनी अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी सहायक पोलीस उपनिरीक्षक के. के. शेख, पोलीस नाईक श्याम पाटील यांनी त्यांना मदत केली.