लहानगा पुतण्या, वाहिनीसह चुलतीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:18 PM2022-07-20T15:18:38+5:302022-07-20T15:19:27+5:30

Tripple Murder Case in Nashik : तिहेरी हत्याकांडाने हादरले होते नाशिक

Life imprisonment for the accused who brutally killed his cousin along with his nephew, bhabhi | लहानगा पुतण्या, वाहिनीसह चुलतीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

लहानगा पुतण्या, वाहिनीसह चुलतीची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Next

नाशिक : चार वर्षांपुर्वी मिळकतीच्या वादातून इगतपुरी तालुक्यातील चिमटे वस्ती येथे झालेल्या तीहेरी खून खटल्यात आरोपी सचिन नामदेव चिमटे (२४,रा.माळवाडी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येक खूनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेप व तीन लाखांचा दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश श्रमती एम.व्ही. भाटिया यांनी ठोठावली. सचिन याने त्याची वृद्ध चुलती, तरुण वहिनी व चार वर्षांचा पुतण्या यांचा निघृणपणे खून केला होता. तसेच सहा वर्षाच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला हाेता. 


घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमटे वस्ती येथे ३० जून २०१८साली जमिनींच्या वादातून आरोपी सचिन चिमटे याने चिमटे वस्ती येथे धारधार शस्त्राने त्याची चुलती हिराबाई शंकर चिमटे (५५) वहिनी मंगल गणेश चिमटे (३०), पुतण्या रोहित गणेश चिमटे (४) यांचा खून केला होता. तसेच दुसरा पुतण्या यश गणेश चिमटे (६) याच्यावरही शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने या हत्याकांडात यश बचावला होता. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात सचिनविरुद्ध भादंवि कलम ३०२,३०७,३२६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामिण पोलिसांनी कसोशीने केला. घोटी पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपासी अधिकारी यांनी परिस्थितीजन्य सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायधीश भाटिया यांच्या तीसऱ्या क्रमांकाच्या न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत सरकार पक्षाकडून विशेष जिल्हा सरकारी वकिल अजय मिसर यांनी एकुण १२ साक्षीदार तपासले. तसेच मिसर यांनी तांत्रिक पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माध्यमातून भरपुर पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, पंचांची साक्षच्या अधारे आरोपी सचिन यास तीहेरी हत्याकांडासह एका प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात दोषी धरले. 

न्यायालयाने सचिन यास प्रत्येकी एका खुनाकरिता मरेपर्यंत जन्मठेप याप्रमाणे एकुण तीन जन्मठेपेसह ३ लाख रुपयांचा दंड अशी मोठी शिक्षा सुनावली. या खून खटल्याच्या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे विशेषत: इगतपुरी तालुक्याचे लक्ष लागलेले होते.

Web Title: Life imprisonment for the accused who brutally killed his cousin along with his nephew, bhabhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.