योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:25 PM2022-02-07T15:25:24+5:302022-02-07T15:26:04+5:30

Yogi Adityanath : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हापूड जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

life threatening tweets from this twitter handel to kill yogi adityanath up police took action | योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी, समोर आले 'या' लेडी डॉनचे नाव

googlenewsNext

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाच्या ट्विटर हँडलवरून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी ट्विटरवर मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हापूड जिल्हा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, असे या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. भाजपच्या सर्व वाहनांवर आरडीएक्सने हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. तसेच, यूपी पोलिसांना (UP Police) टॅग करत पुढे लिहिले आहे की, 'तुमची टीम ठेवा. दिल्ली पाहू नका. योगी मारले जातील'.

एका पाठोपाठ अनेक ट्विट
याच धमकीच्या शैलीत Ladydone3 नावाच्या या ट्विटर हँडलवरून एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट येत आहेत, ज्यात अलिगड पोलिसांना टॅग करत योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे लिहिले आहे.

'सूर्य पाहू शकणार नाहीत'
योगी आदित्यनाथ सूर्य पाहू शकणार नाहीत, असेही या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी सीमा सिंग मानवी बॉम्बच्या रूपात येत आहेत, ज्या योगींना मारतील, असेही म्हटले आहे. 

प्रकरणाचा तपास सुरू
या ट्विटबाबत तक्रार केल्यावर हापूड पोलिसांनी ट्विटरवर रिप्लाय दिला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलीस कारवाई सुरू केल्यानंतर या नावाचे ट्विटर हँडल सध्या दिसत नाही. त्याचबरोबर हापूड पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सायबर सेलकडे सोपवला आहे.

Web Title: life threatening tweets from this twitter handel to kill yogi adityanath up police took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.