गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त; १ लाख ५ हजार किमतीची गावठी दारू नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:27 IST2022-04-14T18:26:24+5:302022-04-14T18:27:23+5:30

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठणीचा पाडा येथील गावठी दारू अड्ड्यावर बुधवारी दुपारी धाड टाकून एकाला अटक केली.

liquor den demolished 1 lakh 5 thousand worth of village liquor destroyed | गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त; १ लाख ५ हजार किमतीची गावठी दारू नष्ट

गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त; १ लाख ५ हजार किमतीची गावठी दारू नष्ट

सदानंद नाईक

 उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठणीचा पाडा येथील गावठी दारू अड्ड्यावर बुधवारी दुपारी धाड टाकून एकाला अटक केली. जप्त केलेली १ लाख ५ हजार रुपये किमतीची हजारो लिटर गावठी दारू जप्त केली. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडवाड गावा जवळील गोठणीचा पाडा येथे गावठी दारूचा अड्डा असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शना खाली पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी दुपारी अड्डीच वाजता धाड टाकली. यावेळी विविध आकाराच्या प्लास्टिक ड्रम मध्ये कच्छी दारू जप्त करून हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. तसेच गावठी कच्ची दारू नष्ट केली. त्याची किंमत १ लाख ५ हजार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. याप्रकरणी कृष्णा सुरेश साळवी याला अटक करून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: liquor den demolished 1 lakh 5 thousand worth of village liquor destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.