मध्यरात्री २ वाजता केली दारूची पार्टी; मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:16 PM2021-06-08T21:16:42+5:302021-06-08T21:17:38+5:30
Gangrape case : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पीडितेवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.
जयपूर - राजस्थानमधील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी जयपूरमध्येही महिला सुरक्षित नाहीत. रविवारी रात्री दोन वाजता ही धक्कादायक घटना घडली, जी सोमवारी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या 22 वर्षीय मुलीची अब्रू लुटली. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेले होते, तिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेने तेथे राहणाऱ्यांच्या मदतीने भांकरोटा पोलिस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, पीडितेवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.
मुलीच्या मित्राने तिला वाटेत एकटे सोडले
पीडित मुलीकडून मिळालेली माहिती अशी की, ती आपल्या मित्रांसह सी स्कीम येथील अहिंसा सर्कलजवळील हॉटेलमध्ये गेली होती. इथे मित्रांसह मद्यपान पार्टी केली. रात्री अडीचच्या सुमारास मित्र रक्षितने तिला काही कामानिमित्त भांकरोटा येथे जाण्यास सांगितले. ते दोघे भांकरोटाच्या दिशेने गेले. परंतु 200 फूट बायपासवर दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर, रक्षित तिला हायवेवर सोडून निघून गेला. दोन तरुण त्यांचे भांडण ऐकत होते, जेव्हा मुलीचा मित्र तिथून निघून गेला, तेव्हा नराधमांनी मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून सामूहिक बलात्कार केला.
हॉटेलमध्ये लॉकडाऊनमध्ये पार्टी, पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न?
जेथे राजधानी जयपूरमध्ये ही सामूहिक बलात्काराची घटना घडली त्यामुळे लोकांना धक्कादायक बसला आहे. त्याचबरोबर हा प्रश्न देखील उद्भवत आहे की कोरोना महामारीमुळे राज्यात कडक बंदोबस्त असूनही, रात्री 2 वाजेपर्यंत कोणतेही रेस्टॉरंट कसे उघडे होते. त्याचबरोबर रात्री उशिरा नाकाबंदी करण्यात आली असतानाही पोलिसांनी त्यांना कुठेही रोखले नाही. त्याचबरोबर रात्री उशिरा पोलिस गस्त घालूनही अशी हृदयद्रावक घटना कशी घडली, असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत.
डाळ, भाजी अन् ८ पोळ्या! जेलमध्ये नाही भरत पोट; हायप्रोटीन डाएटसाठी कोर्टात अर्ज https://t.co/FCx6bwS6am
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021