कारमधील दारूची पार्टी मित्रांना पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:09 PM2018-11-30T17:09:52+5:302018-11-30T17:10:06+5:30
कारमध्ये बसून दारूची पार्टी करणे तिघा मित्रांना महागात पडले आहे.
बारामती : कारमध्ये बसून दारूची पार्टी करणे तिघा मित्रांना महागात पडले आहे. गुरुवारी(दि २९)रात्री या तिघा मित्रांना बारामती ग्रामीण पोलिसांनी कारमध्ये बसुन दारु पिताना रंगेहाथ पकडले. ३०० रुपयांच्या दारुसाठी ३ लाखांची कार पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या मित्रांवर मोठी नामुष्की ओढवली.या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी (दि. २९) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुमारास विद्या प्रतिष्ठानसमोर गाडी ( क्रमांक एमएच ४२— के ३३५४) या इंडीका व्हीस्टा या गाडीत तीन मित्र घेऊन दारू पीत बसलेहोते. यावेळी बारामती तालुक्यात नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेप्रमाणे राजेंद्र जाधव, हवालदार रमेश साळुंके, राजेंद्र जाधव, अनिल खेडकर,अमोल खांडेकर असे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत होते.यावेळी त्यांना तीन व्यक्ती या गाडीत बसून दारू पीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही गाडी जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अमोल संजय खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार अजय राजाराम म्हेत्रे (वय ३९,रा मळद ता दौंड जि पुणे),किशोर गजानन नवले( वय 3७ वर्षे रा मळद),किशोर संपत नरूटे (वय ३५, रा. काजड ता इंदाुपर जि पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे कारमध्ये ३ रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळल्या आहेत. कारमध्ये बिगर परवाना सार्वजनिक ठिकाणी टु बर्गच्या बियर पीत असताना मिळुन आले असल्याचे फियार्दीमध्ये नमुद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे उघड्यावर दारु पिणाऱ्या मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. गाडीत बसून दारू पिणे आता महागात पडणार आहे.अप्पर पोलीस अधिक्षक डॉ संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यामुळे उघड्यावर दारु पिणारे मद्यपी पोलिसांच्या रडारवर आहेत.या कारवाईमध्ये सातत्य राहणार असल्याचेपोलीस निरीक्षक गोडसे यांनी सांगितले.
——————————————
उद्याने, मैदान,संकुले बनली मद्यपींचे अड्डे
कारमध्ये झालेल्या कारवाईमुळे उघड्यावर दारु पिणाऱ्यांवर प्रथमच कारवाई झाली आहे. वास्तविक बारमध्ये दारु पिणे परवडत नाही,त्यामुळे अनेक जण वाईन्स शॉपधमुन दारु विकत घेतात.या मद्यपींच्या उद्याने,मैदान,व्यापार संकुलांमध्येच दारुच्या पार्ट्या रंगतात. बाह्यवळण मार्गावर अनेकदा कारमध्येच दारु च्या बाटल्या रीचवणारे महाभाग आढळतात.मात्र, आज झालेल्या कारवाईमुळे उघड्यावर दारु पिणाºयांवर पोलीसांची नजर राहणार आहे.