लॉकडाऊनदरम्यान जप्त केलेली दारू विकली जात होत पोलीस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:16 PM2020-05-25T21:16:05+5:302020-05-25T21:18:40+5:30
आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबाद - गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दारू विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्टेशनजवळील कालव्यामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यानंतर वरिष्ठ अधिका्यांनी तपास सुरू केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगर रेंजचे आयजी मयंकसिंग चावडा यांना एसपीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. एसपी मयूर चावडा यांनी चौकशीनंतर पोलिसांकडून दारू विक्री झाल्याच्याप्रकरण दुजोरा दिला. या तपासात काडी पोलिस स्टेशनच्या दोन उपनिरीक्षकांसह 9 पोलिसांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिस स्टेशनमधून किती दारू विकली जात होती आणि त्याचा फायदा कोणाला होत आहे याचा एसपी एमजे सोलंकी तपास करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील ३ वर्षात जप्त करण्यात आलेली दारू लॉकडाऊनमध्ये विक्री केली जात होती. आपला कट उघडकीस आला असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी बाटल्या नजीकच्या कालव्यामध्ये टाकल्या.
मुंबईतून संशयित माओवाद्याला अटक, दया नायक पथकाकडून कारवाई
कोरोना इम्पॅक्ट; बलात्कारातील फरार आरोपी घरी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला!
आई आणि 'त्या'ने पप्पांचा गळा आवळला; चिमुरड्याने केली पोलखोल