ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला लाऊड म्युजिक ऐकून शेजारी भडकला, रागाच्या भरात केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:32 PM2021-12-27T21:32:41+5:302021-12-27T21:34:56+5:30
Firing Case :पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मोनकाडा घराच्या लॉनमध्ये घुसला आणि भांडण करू लागला. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याने गोळीबार केला. एक गोळी पीडितेच्या पाठीला लागली.
शेजाऱ्याने मोठ्या आवाजात लावलेले म्युजिक सहन न झाल्यामुळे तरुणाने रागाच्या भरात त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. लाऊड म्यूजिकमुळे झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या. शेजारी मोठ्या आवाजात संगीत वाजवत होता, यावरून त्या व्यक्तीचा त्याच्याशी वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर एकाने दुसऱ्यावर गोळी झाडली.
'न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठ्या आवाजामुळे झालेल्या वादात एका व्यक्तीने शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्टनुसार, 31 वर्षीय जॅचरी मोनकाडा यांच्यावर शेजाऱ्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मोनकाडा घराच्या लॉनमध्ये घुसला आणि भांडण करू लागला. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याने गोळीबार केला. एक गोळी पीडितेच्या पाठीला लागली. तरुणाने रागाच्या भरात त्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यातील एक गोळी शेजाऱ्याच्या पाठीला लागली. त्यानंतर इतरांनी तरुणाला पकडून त्याच्याकडील बंदूक काढून घेतली आणि त्याला निशःस्त्र केलं. मात्र तोपर्यंत शेजारी जखमी झाला होता आणि त्याच्या वेदना वाढल्या होत्या.
गोळीबार झाल्यानंतर शेजाऱ्याला त्याच्या कुटुंबींयांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि उपचार सुरू केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. तर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.