लिअँडर पेसच्या अर्जाला लिव्ह-इन पार्टनर रियाचा विरोध;  घरगुती हिंसाचार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:43 AM2022-12-16T07:43:56+5:302022-12-16T07:44:14+5:30

पेसने दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्यात यावा, यासाठी नोव्हेंबरमध्ये सत्र न्यायालयात अपील केले.

live-in partner Rhea's opposition to Leander Pace's application; Domestic violence cases | लिअँडर पेसच्या अर्जाला लिव्ह-इन पार्टनर रियाचा विरोध;  घरगुती हिंसाचार प्रकरण

लिअँडर पेसच्या अर्जाला लिव्ह-इन पार्टनर रियाचा विरोध;  घरगुती हिंसाचार प्रकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात अपील दाखल करण्यास झालेला विलंब माफ करावा, यासाठी माजी टेनिसपटू लिअँडर पेसने दाखल केलेल्या अपिलाला त्याची माजी लिव्ह-इन-रिलेशनशिप पार्टनर रिया पिल्लईने विरोध दर्शवला आहे. 

पेस याच्या विविध कृत्यावरून रियावर घरगुती हिंसाचार झाल्याचे वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मान्य केले होते. त्यामुळे न्यायालयाने रियाला दरमहा १ लाख रुपये देखभाल खर्च व दरमहा ५० हजार रुपये भाडे देण्याचा आदेश पेसला दिला होता. 

पेसने दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्यात यावा, यासाठी नोव्हेंबरमध्ये सत्र न्यायालयात अपील केले. सत्र न्यायालयात अपील करण्यास झालेला विलंब माफ व्हावा, अशी मागणी पेसने केली. त्यावर रियाने आक्षेप घेत,  विलंब का झाला? याचे समर्थन करण्यासाठी ठोस  कारण नाही. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, २००५ च्या कलम २९ अंतर्गत अपील दाखल करण्याचा  कालावधी ३० दिवसांचा आहे,’ असे रियाने म्हटले आहे.

Web Title: live-in partner Rhea's opposition to Leander Pace's application; Domestic violence cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.