'लि्व्ह इन' पार्टनर निघाला 'दो बच्चो का बाप!', पतीपासून विभक्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 04:15 PM2023-01-29T16:15:55+5:302023-01-29T16:16:38+5:30

पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्या पिडित महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक (३४, रा. असदपुर ता. अचलपुर) याच्याविरूध्द २८ जानेवारी रोजी दुपारी बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

'Live in' partner turns out 'Do Bacho Ka Bap!', woman separated from husband runs to police station | 'लि्व्ह इन' पार्टनर निघाला 'दो बच्चो का बाप!', पतीपासून विभक्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव

'लि्व्ह इन' पार्टनर निघाला 'दो बच्चो का बाप!', पतीपासून विभक्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव

googlenewsNext

अमरावती : लिव्ह इन पार्टनर दोन मुलांचा बाप निघाल्याचे बिंग फुटल्याने महिलेने त्याला जाब विचारला. त्यातून त्याने पुढे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. पतीपासून विभक्त राहणाऱ्या त्या पिडित महिलेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक (३४, रा. असदपुर ता. अचलपुर) याच्याविरूध्द २८ जानेवारी रोजी दुपारी बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी ही ३३ वर्षे वयाची असून ती परतवाडा येथील रहिवासी आहे. सन २००६ मध्ये राजकोट, गुजरात येथील एका व्यक्तीशी तिचे लग्न झाले होते. तिला त्याच्यापासून नऊ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, पतीसोबत पटत नसल्याने ती नऊ वर्षांपासून पतीपासून विभक्त राहते. दोन वर्षांपुर्वी त्यांचा घटस्फोट देखील झाला आहे. दरम्यान परतवाडा येथे राहत असताना तिचा आरोपी शेख अस्मत अब्दुल रज्जाक याच्याशी ओळख झाली. सुमारे पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध बहरल्याने ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये पतीपत्नीसारखे राहू लागले. मात्र तब्बल चार ते पाच वर्षांनंतर तो विवाहित असल्याचे त्याने तिच्यापासून दडवून ठेवले.

मुलासह तिचा जीव घेण्याची धमकी
दरम्यान, सारे काही निट सुरू असताना आरोपी शेख अस्मतचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असल्याचे फिर्यादी महिलेला २७ जानेवारी रोजी दुपारी समजले. ते ऐकून तिच्या पायाखालची वाळू सरकली. त्याबाबत तिने आरोपीला जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन आरोपी शेख अस्मत याने तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. विरोध केला असता तुझा व तुझ्या मुलाचा जिव घेईन अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर तिने धाडस करत शनिवारी दुपारी परतवाडा पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले.

पिडिताच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध बलात्कार व ॲट्रासिटीअन्वये गुन्ह्याची नोंद केली. आरोपीच्या शोधासाठी एक पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.
- संदीप चव्हान, ठाणेदार, परतवाडा

Web Title: 'Live in' partner turns out 'Do Bacho Ka Bap!', woman separated from husband runs to police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.