ॲपवर लाईव्ह लैंगिक व्हिडीओ दाखवला, सबस्क्रिप्शनसाठी एक ते सात हजार दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:41 AM2023-11-06T11:41:12+5:302023-11-06T11:41:27+5:30
अंधेरीतील शिल्प प्रसाद इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये हे व्हिडीओ चित्रित करण्यात आले आहेत.
मुंबई : गुगल प्ले स्टोअरवर पिहू ॲप्लिकेशन तयार करून थेट लैंगिक व्हिडीओ स्ट्रीम करणाऱ्या तीन जणांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ते प्रेक्षकांकडून मेंबरशिप स्वीकारत होते.
वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील मॉडेल टॉवर येथील शिल्प प्रसाद इमारतीत राहणारी तनिषा राजेश कनोजिया (२०), भाईंदर पूर्व येथील नवघर रोडवरील राजलक्ष्मी इमारतीत राहणारा रुद्र नारायण राऊत (२७) आणि तमन्ना आरिफ खान (३४) यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी पिहू ॲप्लिकेशन वेबसाइटवर लैंगिक व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम करत होते.
अंधेरीतील शिल्प प्रसाद इमारतीतील एका अपार्टमेंटमध्ये हे व्हिडीओ चित्रित करण्यात आले आहेत. ते प्रति सदस्य १ हजार ते ७ हजार रुपये होती. दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलिसांना गुगल प्ले स्टोअरवरील पिहू ऑफिशियल ॲपवर व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाली.
ज्यावर १ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत सबस्क्रिप्शन शुल्कासह या महिलांनी लोकांना थेट लैंगिक व्हिडीओंचे सदस्यत्व घेण्यास प्रलोभित केल्याचेही समजले.
या माहितीच्या आधारे वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सचिन शिर्के, सायबर अधिकारी उपनिरीक्षक मनोज हावळे यांच्या पथकाने आरोपी तनिषा कनोजी हिच्या अंधेरीतील घरावर छापा टाकत तिन्ही आरोपींना अटक केली.
मालकाचा आणि ऑपरेटरचा शोध सुरू
आरोपी पिहू ऑफिशियल ॲप्लिकेशनवर लाईव्ह सेक्शुअल शो होस्ट करत होते. आम्ही पिहू ॲप्लिकेशनच्या मालकाचा आणि ऑपरेटरचा शोध घेत आहोत. तसेच आयटी ॲक्ट २९२,२९३ या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिला आणि पुरुष दोघेही लाईव्ह व्हिडीओमध्ये दिसत असल्याचेही आढळून आले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.