Live Video: इस्त्रायलमध्ये माथेफिरुच्या चाकूहल्ल्यात चार ठार, भर रस्त्यात ड्रायव्हरने केले शूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:11 AM2022-03-23T09:11:30+5:302022-03-23T09:11:48+5:30

Terrorist Attack on Israel: इस्त्रायलचे दक्षिणेकडील बिर्शेबा शहरात एक थरारक घटना घडली आहे. एका चौकात अचानक लोक जोरजोरात ओरडू लागले, जिवाच्या आकांताने पळू लागले.

Live Video: Four killed in terrorist knife attack in Israel, driver shot him down in the street | Live Video: इस्त्रायलमध्ये माथेफिरुच्या चाकूहल्ल्यात चार ठार, भर रस्त्यात ड्रायव्हरने केले शूट

Live Video: इस्त्रायलमध्ये माथेफिरुच्या चाकूहल्ल्यात चार ठार, भर रस्त्यात ड्रायव्हरने केले शूट

googlenewsNext

इस्त्रायलचे दक्षिणेकडील बिर्शेबा शहरात एक थरारक घटना घडली आहे. एका चौकात अचानक लोक जोरजोरात ओरडू लागले, जिवाच्या आकांताने पळू लागले. एक माथेफिरू चाकू घेऊन जो दिसेल त्याला भोसकत सुटला होता. या हल्ल्यात महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. तर या माथेफिरूला तिथे आलेल्या शस्त्रसज्ज लोकांनी शूट करत ठार केले.


मंगळवारी झालेल्या या हल्ल्याला पोलिसांनी दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे.  एका शॉपिंग मॉलसमोर ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने आधी एका महिलेवर चाकू हल्ला केला. त्यानंतर त्याने आपली कार एका सायकलस्वारावर आदळवली. यानंतर तो चाकू घेऊन लोकांच्या मागे धावू लागला. यामुळे त्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. लोक मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. या हल्ल्यात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी झाले आहेत. 

टाईम्स ऑफ इस्त्रायलच्या वृत्तानुसार एका बस ड्रायव्हरने धाडस दाखविले. हल्लेखोराचे नाव मोहम्मद गालेब अबू अल-कियान असे आहे. तो हुराच्या बेदौइन शहरात राहणारा होता. दहशतवादी प्रकरणामध्ये त्याला शिक्षादेखील झाली होती. त्याला काबूमध्ये करण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले. दोघांच्या हातात पिस्तूल होत्या. मोहम्मदने एकाच्या हातात पिस्तूल असल्याने त्याच्यावर हल्ला चढविला. तेवढ्यात मागून आलेल्या अन्य एकाने दहशतवाद्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 
 

Web Title: Live Video: Four killed in terrorist knife attack in Israel, driver shot him down in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.