LJP नेत्याचे अपहरण, अपहरणकर्त्यांनी फोन करून केली 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:32 PM2021-05-02T21:32:52+5:302021-05-02T21:39:49+5:30
Kidnapping : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील केट पोलिस स्टेशन अंतर्गत जेपी नगर येथील लोक जनशक्ती पार्टी आदिवासी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अनिल उरांव यांचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती देताना पोलिस अधीक्षक दयाशंकर यांनी शुक्रवारी सांगितले की, अनिल उरांव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, पोलिस पथक वैज्ञानिक संशोधनातून अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सतत छापा टाकत आहेत.
बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमुळे नितीशकुमार सरकार अडचणीत येत आहे. राज्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे विरोधी पक्ष नितीशकुमार यांच्या सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री नितीशकुमार कायदा व सुव्यवस्थेबाबत सातत्याने आढावा बैठक घेत आहेत. मुख्यमंत्री आदेश देऊन सतत कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याच्या बाता मारत आहेत.