बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 02:56 PM2023-09-27T14:56:47+5:302023-09-27T14:57:04+5:30

बिहारमध्ये दिवसा ढवळ्या एका नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

LJP leader killed in broad daylight in Bihar, goons fired in saloon | बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला

बिहारमध्ये दिवसाढवळ्या LJP नेत्याची हत्या, सलूनमध्येच गुंडांनी गोळीबार केला

googlenewsNext

बिहारमध्ये एलजेपीमधील एका नेत्याची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमुळे आता बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. एलजेपी नेते मोहम्मद अन्वर अली खान यांची हत्या केली आहे. ही घटना अमास पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

महिलेने आर्किटेक्चरला पावणेदोन कोटींचा घातला गंडा

या घटनेनंतर जीटी रोड जाम झाला होता. बुधवारी ही घटना घडली, अन्वर अली खान एका सलूनमध्ये दाढी करत होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. अन्वर अली हे एलजेपी लेबर सेलचे प्रदेशाध्यक्ष होते.

बाजारपेठेत गोळीबार होताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक पळू लागले तर काहींनी दुकाने बंद केली. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीय आणि लोकांनी राष्ट्रीय महामार्ग-82 रोखून धरला. गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्वर एका सलूनमध्ये मुंडण करून घेत होते. यावेळी आरोपींनी अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली. यावेळी लोकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

अन्वर अली खान यांनी गुरुवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते परिसरातील एक प्रसिद्ध नाव होते. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: LJP leader killed in broad daylight in Bihar, goons fired in saloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.