बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 08:46 PM2021-01-12T20:46:15+5:302021-01-12T20:46:36+5:30

सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले.

A loan of Rs | बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज

बनावट दागिने देऊन घेतले सव्वातीन लाखांचे कर्ज

Next
ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशान्वये संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : बनावट दागिने देत सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे कर्ज घेत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश राजेश जळगावकर (रा.पौर्णिमा स्टॉपजवळ) असे संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरेश बाबुलाल शाह (रा.गंजमाळ) यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार ५ मे, २०२० रोजी संशयित अंकुश याने सहा अंगठ्या, एक पाटली, एक ब्रेसलेट, एक नेकलेस, दोन वेल, एक चेन, मणी, वाटी, बोरमाळ असे दागिने गहाण ठेवत फिर्यादी शाह यांच्याकडून ३ लाख २७ हजार ३०० रुपयांचे कर्ज घेतले. काही दिवसानंतर फिर्यादी शाह यांनी संशयिताकडे मुद्दल व व्याजाची मागणी केली असता, त्याने देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी शाह यांनी २५ जुलै, २०२० ते दागिने विक्रीसाठी सराफाकडे नेले असता, दागिने बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, शाह यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला. मात्र, त्यानुसार तेथे अदाखलपात्र गुन्हा नोंदविला गेल्याने शाह यांनी न्यायालयात अर्ज दिला. त्यामुळे न्यायालयाने आदेशित केल्यानंतर सोमवारी (दि. ११) संशयित अंकुशविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A loan of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.