शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 07:02 PM2019-01-17T19:02:12+5:302019-01-17T19:15:54+5:30

विनायकविरोधात ५० हून अधिक मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

Local residents of Shiv Sena branch gave Chop, Andheri police to be independent | शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन

शिवसेना शाखाप्रमुखाच्या मुलाला स्थानिकांनी दिला चोप, अंधेरी पोलिसांच्या केलं स्वाधीन

googlenewsNext

मुंबई - अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांच्या मुलाला स्थानिकांनी चोप देत अंधेरी पोलिसांच्या मुलगा विनायकला मोबाईल चोरीप्रकरणी अंधेरी पोलिसांच्या हवाली केले आहे.विनायकविरोधात ५० हून अधिक मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 

 

अंधेरी पूर्व येथील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेनेच्या शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला अमली पदार्थाचे व्यसन असून तो चोऱ्या करून गांजा या अमली पदार्थाचे सेवन करतो. तो व्यसनासाठी चोरी केलेले मोबाईल आणि सोनसाखळ्या विकतो अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली. तसेच आज एकाच मोबाईल चोरताना स्थानिकांनी पाहिले आणि चोप येत पोलिसांच्या हवाली केले. त्याने ५० हून अधिक मोबाईल आणि सोनसाखळी चोरीचे गुन्हे असल्याचे कबुल केले असून पवार यांनी त्याला अटक केली असून पोलीस कोठडीत असल्याचे त्याने सांगितले आहे. 

Web Title: Local residents of Shiv Sena branch gave Chop, Andheri police to be independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.