Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:18 PM2020-04-29T13:18:59+5:302020-04-29T13:25:19+5:30
Lockdown : अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे.
मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये जेवण वाटप करण्याच्या बहाण्याने परवानगी घेऊन अंधेरी येथील दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे दागिने लुटल्याप्रकरणी एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुखास अटक करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त अंकित गोयल यांनी सांगितले की, शहरातील एकता फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल आनंद चमारिया (35) याच्यासह सहा इतर आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 कोटी 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनदरम्यान 22 एप्रिल रोजी राजकुमार लूथरा यांनी तक्रार दिली की, छताला कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करून त्याच्या दागिन्यांच्या दुकानातून सात कोटी रुपयांचे दागिने चोरीस गेले होते, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. पुढे ते म्हणाले की, पोलिसांच्या तीन पथकांनी आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही चामरियाला पकडले. लॉकडाऊनवेळी त्यांना गरजूंना अन्न वाटप करण्याची परवानगी देण्यात आली होती.
दुकानाची माहिती गोळा केल्यानंतर त्याने येऊन सहा साथीदारांसह सोनाराच्या दुकानात दरोडा टाकला. त्यातील चारजण स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करतात. छोटेलाल चौहान, सुरक्षा रक्षक मुन्ना खरवार आणि चामरिया स्वयंसेवी संस्थाचे कामगार नरसप्पा दंडू, शंकर कुमार यशू, राजेश मरपक्का आणि विकास चनावडी अशी इतरांची नावे आहेत.
आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...
Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली
खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून
लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या