Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:32 PM2020-05-24T12:32:55+5:302020-05-24T12:37:12+5:30

नॅशनल फेअर हाउसिंग अलायन्स (एनएफएएचए) च्या अहवालानुसार, संपूर्ण अमेरिकेत १०० हून अधिक फेअर हाऊसिंग ग्रुपमधील लोकांना या समस्येला तोंड देताना पाहिलं आहे

Lockdown: Demanding sexual relation from women instead of paying rent pnm | Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

Next
ठळक मुद्देभाड्याच्या बदल्यात लैंगिक मागणी करण्याची प्रकरणे आता ब्रिटन तसेच अमेरिकेतही समोरलॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याने गैरफायदा या साथीच्या काळात देशात लैंगिक छळाच्या घटनांमध्ये १३% वाढ

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. अशामुळे लोकांना घरीच बसावं लागत आहे. कामकाज ठप्प झाल्यामुळे अनेक लोकांच्या पगारात कपात केली आहे. या परिस्थितीत भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना वेगळ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरी जाण्याने आणि पगार कपात होण्याने भाड्याचे पैसे द्यायला नाहीत त्याच घरमालक भाड्याने राहणाऱ्या महिलांकडे भाड्याच्या पैशाऐवजी शारिरीक सुखाची मागणी करत आहेत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

नॅशनल फेअर हाउसिंग अलायन्स (एनएफएएचए) च्या अहवालानुसार, संपूर्ण अमेरिकेत १०० हून अधिक फेअर हाऊसिंग ग्रुपमधील लोकांना या समस्येला तोंड देताना पाहिलं आहे. या साथीच्या काळात देशात लैंगिक छळाच्या घटनांमध्ये १३% वाढ झाली आहे. एनएफएएचए वेबसाइटच्या माध्यमातून एका महिलेने सांगितले की, मी माझ्या प्रॉपर्टी मॅनेजरशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता तर त्याने मला घराबाहेर काढले असते. एकटी आई असल्याने माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला माझे घर गमवायचे नव्हते.

भाड्याच्या बदल्यात लैंगिक मागणी करण्याची प्रकरणे आता ब्रिटन तसेच अमेरिकेतही चौकशीनंतर पुढे येत आहेत. सेक्सच्या बदल्यात भाड्यामध्ये सूट अशा सुविधेच्या नावाखाली वाढत्या ऑनलाइन जाहिरातींचा पडदाही उठत आहे. जगभरात कोरोना विषाणूचा वेगवान प्रसार झाल्यामुळे लाखो लोकांना नोकर्‍या गमावाव्या लागल्या आहेत. लॉकडाऊन आणि प्रवास बंदीनंतर लोकांचा व्यवसाय ठप्प झाला. उत्पन्नाची सर्व साधने संपल्यानंतर आज ते आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. उत्तर अमेरिका आणि युरोपियन अधिकारी लोकांना बेघर होण्यापासून रोखण्यासाठी रोख फायदे, भाडे गोठवण्यापासून अन्य नियम आणत आहेत. एनएफएएचएचे सल्लागार मॉर्गन विल्यम्स म्हणतात की, घराबाहेर पडू नये म्हणून असहाय लोकांसमोर अनेक कठीण पर्याय समोर येतात.

गृहनिर्माण संस्था शेल्टर (इंग्लंड) च्या 2018 च्या अहवालानुसार, मालमत्ता व्यवस्थापकांनी गेल्या पाच वर्षात भाडे न देण्याऐवजी सुमारे अडीच लाख महिलांना लैंगिकतेची ऑफर दिली होती. सेक्स्टोरेशन (लैंगिक छळ) विरोधात मोहीम राबविणाऱ्या ब्रिटीश कायदेतज्ज्ञ वेहा हॉबहाऊस म्हणाले, भाड्याच्या विरोधात लैंगिक संबंधाची मागणी वाढण्याची शक्यता आधीच निर्माण झाली होती, कारण लॉकडाऊनच्या वेळी लोकांना घरात राहण्याशिवाय पर्याय नाही.

प्रॉपर्टी मॅनेजर त्यांना घरातून हाकलून लावतील अशी भीती असल्याने बहुतेक महिला घरमालकांविरूद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करत नसल्याचा दावा एनएफएचएने आपल्या अहवालात केला आहे. दुसरे, त्यांच्या आर्थिक अडचणींशी संबंधित काही कारणे असू शकतात असंही सांगण्यात आलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोल्लममधील महिलेचा मृत्यू सर्पदंशाने की हत्या?; पोलिसांनी पतीसह २ जणांना घेतलं ताब्यात

माकडांवरील कोरोना लस चाचणीमुळे अपेक्षा वाढल्या; प्रयोगानंतर शरीरात झाला चमत्कार!

भाऊ, नावातचं सगळं आहे! चक्क कोरोना रुग्णाला दिला डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची पळापळ

जाणून घ्या! कोरोना व्हायरस कधीपर्यंत नष्ट होणार?; ज्योतिषांची ‘भविष्यवाणी’

 “...तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”

Web Title: Lockdown: Demanding sexual relation from women instead of paying rent pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.