Lockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 05:59 PM2020-05-28T17:59:20+5:302020-05-28T18:01:41+5:30
डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद संशयीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन त्यास चेंबूर येथून ताब्यात घेतले.
मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी सरसावले आहेत. तसेच मुंबईतील अनेकजण आपल्या गावी जाण्यासाठी पोलिसांकडून मिळणाऱ्या ईपास मिळवण्यासाठी कसरत करत आहेत. मात्र, याचा फायदा घेऊन एक इसम असाच लोकांना बोगस ई पास देऊन गंडा घालत होता. या दुकलीच्या मुसक्या डोंगरी पोलिसांनी आवळल्या आहेत.
अनोळखी इसम मोबाईल क्रमांक 90 29 541301 हा व्यक्ती प्रत्येकी 5000/- रुपये घेऊन राज्यात इतरत्र प्रवास करण्यासाठी शासनाचे पास अनधिकृतपणे गरजू व्यक्तींना देत आहे, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्याची शहानिशा करून कारवाई करणे बाबत आदेश पोलिसांना प्राप्त झाले. त्याप्रमाणे डोंगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश लिंगे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी नमूद संशयीत मोबाईलधारकाचा शोध घेऊन त्यास चेंबूर येथून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या पोलीस चौकशीत त्याचे नाव मनोज हुंबे असल्याचे व त्याने त्याचा साथीदारच्या मदतीने संगणमत करून मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे कार्यालय, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचे कार्यालय आणि जिल्हाधिकारी पालघर यांचे कार्यालय यांचेमार्फत प्रवासाची सवलत मिळण्यासाठी मिळणारे ऑनलाईन क्यूआर कोडमध्ये फेरफार करून बनावट पास हे खरे पास आहेत असे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली म्हणून पोलीस अधिकारी लिंगे यांच्या तक्रारीवरून भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 471 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 (c), 66(d) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नामे मनोज रामू हुंबे वय 28 वर्ष अटक करण्यात आली आहे.
वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात
नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती