लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:59 PM2020-07-01T13:59:09+5:302020-07-01T14:00:34+5:30
या नैराश्यातच त्याने जीवनाला कंटाळल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : कोरोनाचा जगभर कहर सुरु असल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू झाले आहे. त्यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने सामान्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून हाताला काम नसल्याच्या नैराश्यात जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्याने तणावात आलेल्या रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (२३, रा.वडली, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन तर लहू कौतिक पाटील (७०, रा.लोणवाडी, ता.जळगाव) या वृध्दाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी उघडकीस आल्या. याच महिन्यात याआधी लॉकडाऊनमुळे पाच जणांनी जीवन संपविले आहे.
मंदिराच्या मागे झाडाला घेतली गळफास
वडली, ता.जळगाव येथे रितेष उर्फ राजू याने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या देवराम महाराज मंदिराच्या मागे निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. राजू हा वाहन चालक होता. ट्रॅक्टर, चारचाकी कार, मालवाहू वाहनांवर रोजंदारीने तो कामाला जात होता. मात्र, तीन महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाल्याने हे काम बंद झाले. कधी तरी अधूनमधून काम मिळत होते. कायमस्वरुपी रोजगार नाही, आधीच आर्थिक परिस्थिती हलाखीची. वडील व मोठ्या भावाचेही काम थांबले होते. या नैराश्यातच त्याने जीवनाला कंटाळल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धावत्या रेल्वेखाली झोकून वृध्दाने केली आत्महत्या
लोणवाडी येथील लहू कौतिक पाटील (७०) या वृध्दाने मंगळवारी सकाळीच घर सोडले. संध्याकाळी पाच वाजता म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावरील रुळावर त्यांचा एक धड नसलेला मृतदेह आढळून आला. मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहू पाटील यांची परिस्थिती देखील जेमतेम होती. मुलगा अनिल हा सुरत येथे परिवारासह रहात होता. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मुलगा परिवारासह घरी आला होता तर मोठा मुलगा भाऊसाहेब हा सासरवाडीला खांडवा, ता.मोताळा, जि.बुलडाणा येथे वास्तव्याला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या
TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह
ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात
मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार