बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 22:37 IST2020-04-30T22:32:32+5:302020-04-30T22:37:00+5:30
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये लॉकडाउनदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको
संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. गाझियाबाद येथील सहीबाबाद जिल्हा पोलिसांना या तक्रारीने धक्का बसला आहे. बुधवारी एका आईने तक्रार केली, या तक्रारीत तिने मुलाला किराणा आणायला पाठवले असता तो बायकोला घेऊन घरी आला, मी त्याच्या बायकोला स्वीकारू शकत नाही, असे नमूद केले होते.
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये लॉकडाउनदरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. आईने मुलाला किराणा माल खरेदी करण्यासाठी गेला आणि चक्क लग्नच करुन घरी आला. जेव्हा पोलिसांनी गुड्डू या मुलाला याबाबत विचारले असता 26 वर्षीय या नवरदेवाने सांगितले की, त्याने 2 महिन्यांपूर्वी हरिद्वार येथील आर्य समाज मंदिरात सविताशी लग्न केले होते. प्रत्यक्षदर्शींच्या अभावामुळे त्याला लग्नाचे प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते. नंतर पुन्हा उत्तराखंडात कागदपत्रांसह येण्याचे ठरवले, मात्र तोवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जोडप्याला घरगुती कलह सामंजस्याने सोडविण्यास सुचवले. लॉकडाऊनमध्ये गुड्डू आणि त्याची पत्नी सविता हिने भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
टक करण्यात आली आहे. अन्य तीन फरार आरोपींचाही शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यांनी दिली.
Coronavirus : पोलिसाविरोधात FIR, होम क्वारंटाईन असलेल्या पोलिसाला घराबाहेर पडणं पडलं महागात
वेळात वेळ काढून चिमुकल्या मायराच्या वाढदिवसाला जेव्हा पोलीस हजेरी लावतात...
Coronavirus Lockdown : मास्क न घातल्याने सीआरपीएफ जवानाला मारहाण, पोलिसाचे केले निलंबन