Lockdwon 4.0 : सोसायटीने केले लॉकडाऊनचे उल्लंघन, समोसा पार्टी केल्याने पोलिसांकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:05 PM2020-05-20T16:05:37+5:302020-05-20T16:13:06+5:30
Lockdwon 4.0 : याप्रकरणी पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे.
मुंबई - घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीत लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवून समोसा पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे.
लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु असून या काळात समोस पार्टीचे आयोजन करून लॉकडाऊनचे तीनतेरा वाजवल्याप्रकरणी घाटकोपर येथील पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोसायटीच्या अध्यक्षाला आणि समोसा पार्टीच्या आयोजकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. सोशल मीडियावरही या समोसा पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले सोसायटीच्या आवारात 20 ते 30 जण एकत्र जमून समोसा पार्टी करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.
Members of a housing society in Pant Nagar Area of Ghatkopar were booked for violating lockdown norms by organising a 'samosa party'. Chairman of the housing society & organiser of the party were arrested & released on bail. Further probe is underway: Mumbai Police pic.twitter.com/vqhceKL0Ws
— ANI (@ANI) May 19, 2020
कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव
बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट
धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक