धक्कादायक! आईने ५ वर्षीय मुलीची १५ वेळा चाकूने वार करत केली हत्या, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 01:30 PM2021-06-25T13:30:42+5:302021-06-25T13:33:50+5:30
'द सन'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांवरून समजलं की, सुथा शिवनाथमने आपल्या पाच वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली.
ब्रिटनची राजधानी लंडनमधून एक हैराण करणारी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपल्या ५ वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली. ३६ वर्षीय सुथा शिवनाथमला या अमानविय कृत्यासाठी पोलिसांनी अटक केली असून तिची कोर्टात सुनावणी सुरू आहे.
का केली मुलीची हत्या?
'द सन'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांवरून समजलं की, सुथा शिवनाथमने आपल्या पाच वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली. कारण तिच्या मनात भीती होती की, तिला कोरोनाची लागण होणार आणि ती कोरोनामुळे मरणार. त्यानंतर तिला वाटलं की, असं झालं तर तिची मुलगी तिच्याशिवाय राहू शकणार नाही. (हे पण वाचा : आई की वैरीण! अडीच लाखांसाठी एका आईने केली स्वत:च्या मुलीची हत्या, असा झाला खुलासा)
चिमुकलीवर १५ वेळा केले वार
मीडिया रिपोर्टनुसार, सुथा शिवनाथमने आपल्या दक्षिण लंडनमधील फ्लॅटच्या बेडरूममध्ये मुलगी सयागी शिवनाथमवर १५ वेळा चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर सुथाने स्वत:वरही चाकूने वार केले. शेजाऱ्यांनी दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं.
काय म्हणाले मुलीचे वडील?
कोर्टात सुनावणी दरम्यान मुलीचे वडील सुगंथन शिवनाथम यांनी सांगितलं की, कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे त्याच्या पत्नीवर वाईट प्रभाव पडला. ते म्हणाले की, तिला भीती होती की, तिला कोरोना होणार आणि ती मरणार. हे सांगत असताना ते जोरजोरात रडू लागले होते.
कोर्टात सादर कागदपत्रांनुसार, सुथा शिवनाथम आणि सुगंथनचं २००६ साली अरेंज मॅरेज झालं होतं. त्यानंतर ती पतीसोबत लंडनमध्ये राहत होती. मात्र, तिला इंग्रजी बोलता येत नव्हतं. (हे पण वाचा : बाप लेकीच्या नात्याला काळिमा! सलग तीन वर्ष नराधम बाप मुलीवर करत होता बलात्कार )
मानसिक आजाराची शिकार
सुथा शिवनाथमवर उपचार करणाऱ्या एका मनसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं की, 'कोविड-१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच सोशल आयसोलेशनमुळेही लोकांना गंभीर रूपाने मानसिक आजारी केलं आहे'. तेच सुथाचे पती म्हणाले की, 'या घटनेनंतर ते अजून पत्नीसोबत बोलले नाहीत. पण मला माहीत आहे की, ती यासाठी जबाबदार नाहीये. मला माहीत आहे जर ती बरी असली असती तर आमच्या मुलीला तिने कधी मारलं नसतं'.