हजारो फूट उंचीवर उडत असलेल्या विमानात महिलेसोबत रेप, फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:58 PM2022-02-09T14:58:26+5:302022-02-09T14:59:54+5:30
Rape in the Flight : ओव्हर नाइटच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या ब्रिटिश महिलेले आरोप लावला की, जेव्हा सगळे प्रवासी झोपलेले होते, तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर रेप केला.
दररोज जगभरातून रेपच्या धक्कादायक घटना समोर येतात. अशीच घटना लंडनमधून (London) समोर आली आहे. हवेत उडत असलेल्या विमानात एका महिलेसोबत रेप (Rape in the Flight) करण्यात आला आहे. पीडिता विमानाच्या फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये होते, तेव्हाच तिच्यावर एका व्यक्तीने रेप केला. विमान लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
'डेली मेल' च्या रिपोर्टनुसार, विमान नेवार्क न्यू जर्सीहून लंडनला (Newark, New Jersey to London) जात होतं. ओव्हर नाइटच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या ब्रिटिश महिलेले आरोप लावला की, जेव्हा सगळे प्रवासी झोपलेले होते, तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर रेप केला. आरोपीही ब्रिटनचा राहणारा आहे. घटनेनंतर महिलेने यूनायटेड एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सना याची माहिती दिली. त्यांनी हीथ्रो एअरपोर्टला याची माहिती दिली आणि फ्लाइट लॅंड होताच आरोपीला अटक केली गेली.
गेल्या आठवड्यात झालेल्या या घटनेतील आरोपी आणि महिलेचं वय ४० च्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी विमानातील लक्झरी कॅबिनमधील फिंगर प्रिंट्स आणि इत्यादी पुरावे गोळा केलेत. तेच काही पॅसेंजर्स म्हणाले की, फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये दोन लोक होते आणि सुरूवातील ते अनोळखी वाटत होते. पण नंतर त्यांना एकत्र कॅबिनच्या लाउन्जमधील बारमध्ये बघण्यात आलं. पोलीस याचीही माहिती घेत आहेत की, महिलेच्या आरोपात किती सत्यता आहे.
या संपूर्ण प्रकरणावर एअरलाइन्सकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. प्रश्न असाही उपस्थित होत आहे की, अखेर विमानाच्या फर्स्ट क्लास कॅबिनमध्ये अशी घटना कशी होऊ शकते? पोलिसांनी सांगितलं की, ते महिलेच्या आरोपांची खोलवर चौकशी करत आहेत. ते DNA आणि इतर पुराव्याच्या आधारावर सत्य उघड करतील.