लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन

By पूनम अपराज | Published: October 24, 2020 09:01 PM2020-10-24T21:01:14+5:302020-10-24T21:01:46+5:30

Police Officer Suspended : आता उपनिरीक्षकाने दाढी कापली असून त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले.

Long beard police officer cut his beard and come on duty, which was suspende | लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन

लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन

googlenewsNext
ठळक मुद्देहे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रमला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली आणि त्याच्या लांब दाढीशी संबंधित आहे.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात तैनात असलेल्या एका उपनिरीक्षकाला लांब दाढी वाढवल्यामुळे निलंबित करण्यात आले. तथापि, आता उपनिरीक्षकाने दाढी कापली असून त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले.

हे संपूर्ण प्रकरण बागपतच्या रमला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली आणि त्याच्या लांब दाढीशी संबंधित आहे. बागपतच्या पोलिस अधीक्षकांनी उपनिरीक्षकाला तीनदा दाढी करण्याचा इशारा दिला होता, परंतु तरीही तो लांबसडक दाढीमध्ये कर्तव्य बजावत राहिला. या कारणास्तव बागपतच्या एसपीने त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. आता अंतसार अली दाढी करून एसपीसमोर हजर झाले. त्यानंतर अंतसार अली यांना पुन्हा बसविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षकावर ही विभागीय कारवाई केवळ पोलीस नियमावलीनुसारच केल्याचे सांगण्यात येत आहे.

विनापरवानगी दाढी लांब वाढवल्याने पोलीस अधिकाऱ्याचं केलं निलंबन 

पोलीस मॅन्युअल काय म्हणतं?

उत्तर प्रदेश पोलिसांच्या मॅन्युअल व नियमांनुसार, शिख वगळता कोणालाही वरिष्ठ अधिकारी यांना परवानगी न घेता दाढी ठेवण्यास परवानगी नाही. पोलीस विभागाचे कर्मचारी परवानगीशिवाय मिशा ठेवू शकतात, परंतु दाढी ठेवू शकत नाहीत. जो कोणी शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा अधिकाऱ्यास दाढी ठेवायची असल्यास संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते.



अलीकडेच रमाला पोलिस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक अंतसार अली यांना परवानगीशिवाय लांब दाढी ठेवल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. सहारनपूरचे रहिवासी अंतसार अली हे उत्तर प्रदेश पोलीस दलात एसआय पदावर कार्यरत होते. गेली तीन वर्षे ते जिल्ह्यात कार्यरत आहेत. लॉकडाऊन करण्यापूर्वी त्यांना रमाला पोलिस स्टेशनमध्ये तैनात केले होते. पोलिस विभागाच्या नियमांच्या विरोधात लांब दाढी ठेवण्याबाबत त्यांच्याबाबत चर्चा झाली होती.

 

 

Web Title: Long beard police officer cut his beard and come on duty, which was suspende

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.