इशारा करून कार थांबवली; बनावट आयकर अधिकारी बनून हिरे व्यावसायिकाकडून लुटले 8 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:04 AM2024-02-28T10:04:53+5:302024-02-28T10:15:56+5:30

एका व्यक्तीने हिरे व्यापाऱ्याला टार्गेट करून 8 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. 

looted of rs 8 crore in cash from diamond businessman in surat | इशारा करून कार थांबवली; बनावट आयकर अधिकारी बनून हिरे व्यावसायिकाकडून लुटले 8 कोटी

फोटो - आजतक

गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सूरत आणि गुजरात सरकारचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या शहरात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहे. रोज काही ना काही धक्कादायक घटना घडत असतात. सूरतच्या कतारगाम भागात मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीने हिरे व्यापाऱ्याला टार्गेट करून 8 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. 

गुन्हा केल्यानंतर आयकर अधिकारी म्हणून खोटी ओळख सांगणारा आरोपी सहज फरार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. आरोपी इको कार थांबवतो आणि त्यातील इतर लोकांना थोड्या वेळाने खाली उतरवतो आणि गाडी घेऊन पळून जातो. सूरत पोलिसांनी आठ कोटी रुपयांच्या लुटमारीच्या या घटनेचा उलगडा करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली असून, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये इको कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तेवढ्यात हातात ब्रीफकेस आणि डोक्यावर टोपी घातलेला एक माणूस समोर येतो. तो इको कार चालकाला हात दाखवतो आणि थांबायला सांगतो. गाडी थांबल्यावर आरोपी हातात ब्रीफकेस घेऊन कारचा दरवाजा उघडतो.

गाडीमध्ये काही लोक बसलेले दिसतात. त्याव्यक्तीने कारमध्ये असलेल्या लोकांना तो आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगितलं. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांना तो आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं त्याचं खोटं ओळखपत्रही दाखवतो. त्यांना कार पुढे नेण्यास सांगते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये 4 जण बसले होते. स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी म्हणवून घेणारा व्यक्ती थोड्या अंतरावर गेल्यानंतर दोन जणांना गाडीतून खाली उतरायला सांगतो. त्यानंतर तो इतर दोघांना देखील काही अंतरावर गेल्यावर खाली उतरायला सांगतो आणि नंतर एकटाच गाडी घेऊन पळून जातो.

हिरे व्यावसायिकाने तिजोरीतून आठ कोटी रुपये काढले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तो इको कारमधून प्रवास करत होता. त्यानंतर एक अनोळखी व्यक्ती स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी म्हणतो. त्यात बसलेल्या चार जणांसह तो हिरे व्यावसायिकाच्या कारनेच पुढे जातो. यानंतर तो चारही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडतो. मग तो एकटाच कार घेऊन पळून जातो.

या घटनेबाबत सध्या सूरत पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. सूरत क्राइम ब्रँच आणि स्थानिक कतारगाम पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथक वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, आयकर विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करणारा आरोपी कोणतीही संशयास्पद कृती करताना दिसत नाही.

Web Title: looted of rs 8 crore in cash from diamond businessman in surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.