नवरीने पहिल्या रात्रीनंतर दिला असा 'दणका', नवरदेवाला बसला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:26 PM2023-01-12T12:26:53+5:302023-01-12T12:27:09+5:30
Crime News : तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.
Crime News : भारतात लग्न म्हटलं एखाद्या सणासारखंच वातावरण असतं. अनेक दिवस वेगवेगळे रिती-रिवाज सुरू असतात. होणारे नवरी-नवरदेव नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत असतात. एकंदर काय तर आनंदाच वातावरण असतं. कोणत्याही तरूण-तरूणीला लग्नानंतर त्यांच्या मधुचंद्राची उत्सुकता असते. ते आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात. नवरी घरात येते आणि वेगवेगळे रिवाज पार पाडताना सगळेच खूप एन्जॉय करतात. अशात तुम्हाला जर समजलं की, तुमच्या घरात आलेली नवरी 'लुटेरी दुल्हन' आहे आणि नवरदेवाच्या घरातील सगळं काही ती लुटून घेऊन गेली तर? अर्थातच मुलाकडील लोकांना धक्का बसेल. अशीच एक घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या भरतपूरमधील ही घटना आहे. मधुचंद्राला नवदाम्पत्य त्यांच्या नव्या जीवनाची सुरूवात करतात. पण जेव्हा नवरदेवाला हे समजतं की, जिच्या आलिंगणाला त्याच्या संसार समजत आहे ती 'लुटेरी दुल्हन' गॅंगची सदस्य आहे तर तेव्हा त्याच्या मनात काय चालू असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ही घटना भरतपूर जिल्ह्याच्या बैसोडा गावातील आहे.
नवी नवरी लग्नाच्या काही दिवसांनंतर घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊ फरार झाली. नवरीच्या या कृत्यामुळे नवरदेवाला धक्का बसला, तर त्याच्या परिवारात एक गोंधळ झाला.
हे प्रकरण जेव्हा पोलिसात गेलं तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसांनी लगेच कारवाई करत गॅंगमधील 2 महिलांना आणि एका दलालाला अटक केली. चौकशीत तर दलालाने आणखी धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, त्याने दोन्ही महिलांना 2-2 हजार दिवसाच्या हिशेबाने कामावर ठेवलं आहे. म्हणजे गॅंग तरूणींना 2-2 हजार रूपये देऊन त्यांचं लग्न लावून देत होता. नंतर नवरदेवाच्या घरात चोरी करून त्या फरार होत होत्या.
मीडिया रिपोर्टनुसार, मुलाच्या परिवाराकडून तक्रार दिल्यावर आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी एका महिलेला उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद तर दुसरीला मैनपुरीमधून अटक केली होती. हे खरंच धक्कादायक आहे की, नवरी रोजाच्या हिशेबाने भाड्याने आणली जाते आणि त्यांच्याकडून चोरी करून घेतली जाते.