६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:10 PM2019-05-29T15:10:42+5:302019-05-29T15:12:14+5:30

इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये  हेल्मेट न वापरल्याने गमवावे लागले आहेत. 

Lost 6 lakhs rupees due to not wearing Helmet | ६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं!

६ लाखांचा फटका; हेल्मेट न घालणं भलतंच महागात पडलं!

Next
ठळक मुद्दे२०१३ साली अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या सहप्रवाश्याच्या डोक्यास दुखापत झाली होती. मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला देत हेल्मेट न वापरल्याने बेजबाबदारपणामुळे १५ टक्के रक्कम करण्याचे आदेश दिले. 

तामिळनाडू - बहुतेक वेळा बेजबाबदारपाने दुचाकीचालकच्या मागे बसलेला सहप्रवासी हेल्मेट वापरत नाही. याचमुळे तामिळनाडूतील मदुरै येथील एका व्यक्तीस महागात पडलं आहे. २०१३ साली अपघातात दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या सहप्रवाश्याच्या डोक्यास दुखापत झाली होती. दरम्यान इन्शुरन्स कंपनीकडून मिळणारे ६ लाख रुपये  हेल्मेट न वापरल्याने गमवावे लागले आहेत. 

 मोटार अ‍ॅक्सिडेंट्स ट्राइब्यूनल मदुरै यांनी सर्व बाबींचा तपास करून अपघातात जखमी झालेल्या तरुणास ४५.५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र,  ट्राइब्यूनलने नंतर अपघातग्रस्त तरुणाने हेल्मेट न घातल्याने ६ लाख रुपये कमी करत ३९.५ लाख इतकी केली. अपघातातग्रस्त आणि याचिकाकर्ता तरुण एम. विग्नेश्वरन याने नुकसान भरपाई म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली होती. मदुरै येथे २०१३ साली अवनियापुरम बायपास रोडवर एका बाईकने दुसऱ्या बाईकला धडक दिल्याने विग्नेश्वरनला डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. विग्नेश्वरन हा बाइकस्वाराच्या मागे बसला होता. विग्नेश्वरन हा अंबातूर इंडस्ट्रिअल स्टेट चेन्नईच्या एका इंजिनियरिंग कंपनीत ज्युनिअर टेक्निशियन म्हणून काम करत होता. १६ जानेवारी २०१३ रोजी तो आपल्या मित्राच्या बाईकवर मागच्या सीटवर बसून प्रवास करत होता. याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडताना पेट्रोल पंपकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटारबाइकने धडक दिली. या अपघातात बाईकवर मागे बसलेल्या तरुणास डोक्यास इजा झाली. तसेच मेंदूस मार देखील लागला होता. मदुरै येथील नजीकच्या रुग्णालयात विग्नेश्वर याच्यावर तीन महिने उपचार सुरु होते. तसेच केरळ येथील रुग्णालयात देखील त्याच्यावर पूर्ण बरं होईपर्यंत फिजिओथेरपीचा उपचार घ्यावा लागला.

दरम्यान विमा कंपनीने देखील आपल्या जबाबत या अपघातास बाईकचालक आणि त्याचा मागे बसलेला मित्र जबाबदार असल्याचे नमूद केले. इन्शुरन्स कंपनीने ट्राइब्यूनलकडे युक्तिवाद करताना सांगितले की, कोणताही इशारा न करता बाईक वळविल्याने दुसऱ्या बाइकस्वारास न कळल्याने तो गोंदळून गेल्याने हा अपघात झाला. ट्राइब्यूनलचे न्या. थंगावेल यांनी उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून याचिकाकर्त्यास हेल्मेट न वापरल्याने अपघातादरम्यान डोक्यास गंभीर दुखापत झाली. मद्रास हायकोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला देत हेल्मेट न वापरल्याने बेजबाबदारपणामुळे १५ टक्के रक्कम करण्याचे आदेश दिले. 

Web Title: Lost 6 lakhs rupees due to not wearing Helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.