रिल्स बनवताना तरुणांचे हरपले भान; जैन मुनींना दुचाकीची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:25 AM2023-02-28T05:25:43+5:302023-02-28T05:25:54+5:30

सौम्यसागरजी महाराजांसह एक भाविक जखमी

Lost consciousness while making reels; Jain Muni was hit by a bike at jintur | रिल्स बनवताना तरुणांचे हरपले भान; जैन मुनींना दुचाकीची धडक

रिल्स बनवताना तरुणांचे हरपले भान; जैन मुनींना दुचाकीची धडक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (जि. परभणी) :  जैन मुनीश्री सौम्यसागरजी महाराज हे अन्य ५ जैन मुनीश्रींसोबत पायी चालत बोरीवरून चांदजकडे येत असताना  दोन दुचाकींवर बसून ४ तरुण रिल्स (व्हिडीओ) बनवत भरधाव वेगाने आले. त्यांनी मुनीश्री सौम्यसागरजी महाराज व त्यांच्या सोबतच्या जिंतूर येथील सेवेकरी संकेत मोहारे यांना जोराची धडक दिली. यात महाराजांसह भाविक जबर जखमी झाले आहेत. ही घटना बोरी तांड्याजवळ रविवारी सायंकाळी घडली.

अपघातानंतर रक्तबंबाळ अवस्थेतही होणाऱ्या वेदना सहन करत मुनीश्री घटनास्थळी बसले होते. घटनेची माहिती मिळताच डॉ. विशाल परिहार, सचिन राठोड यांच्यासह  जैन साधकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात मुनीश्री सौम्यसागरजी महाराज यांच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. जिंतूर शहरात मुनीश्रींवर उपचार सुरू आहेत.

वाहनात बसण्यास नकार 
अपघातानंतर मुनीश्रींना उपचारासाठी वाहनातून रुग्णालयात चलण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी नम्रपणे नकार दिला. याबाबत त्यांच्या गुरूंना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरू आदेशाने ते स्ट्रेचरवर बसले. भाविकांनी स्ट्रेचर ढकलत जिंतूरपर्यंत आणले.

मुनीश्री महाराजांवर आयुर्वेदिक उपचार
मुनींश्री सौम्यसागरजी महाराज यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू असून मुंबई येथील डॉ. सुभाष शहा हे मुनींश्रीवर उपचार करीत आहेत. सध्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी महाराजांचे वास्तव्य असून महाराजांच्या सेवेसाठी परमपूज्य मुनींश्री वीरसागरजी महाराज हिंगोली येथून ९ मुनीश्रींसह जिंतूर शहरात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

Web Title: Lost consciousness while making reels; Jain Muni was hit by a bike at jintur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात