लालबागच्या गर्दीत हरवला ९ तोळ्यांचा ऐवज; पोलिसांनी दिला २ तासांत शोधून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:01 PM2019-09-13T22:01:04+5:302019-09-13T22:01:37+5:30
९ तोळे सोन्याचा ऐवज पोलिसांनी पवार दाम्पत्यांना सुपूर्द केला आहे.
मुंबई - गेले दहा दिवस लालबाग परळ परिसर गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी फुलून गेला होता. या गर्दीत प्रवासाच्या वेळी माधुरी पवार आणि त्यांचे पती लालबागमध्ये होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेली बॅग्स ठरविल्या होत्या. या बॅग्समध्ये त्यांचे ९ तोळे सोन्याचे दागिने होते. याबाबत त्यांनी १० सप्टेंबरला तात्काळ काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत त्यांची हरविलेल्या बॅग इतक्या गर्दीतही शोधून दिली. त्यातील ९ तोळे सोन्याचा ऐवज पोलिसांनी पवार दाम्पत्यांना सुपूर्द केला आहे.
माधुरी पवार व त्यांचे पती यांना प्रवासा दरम्यान असे कळून आले कि त्यांच्या बॅग्स इतर प्रवाश्या सोबत बदलल्या आहेत. तात्काळ काळाचौकी पोलीस ठाणेस तक्रार करताच तेथील पोलीस उप निरीक्षक जाधव आणि टीम यांनी अवघ्या दोन तासात त्यांची बॅग व त्यातील ९ तोळे सोन्याचा ऐवज त्यांना सुपूर्द केला.
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 10, 2019
After Madhuri Pawar and her husband realised that their bags of gold ornaments had been accidentally exchanged with another passenger, they immediately reached out to Kalachowki Pstn. PSI Jadhav and team ran their search and recovered it within just 2 hours. #MumbaiFirstpic.twitter.com/lpF64FR2sI
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 10, 2019