बॉय़फ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली पत्नी; पतीला चहात दिलं विष; मृत्यूनंतर Video मुळे झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 04:15 PM2023-04-09T16:15:15+5:302023-04-09T16:15:28+5:30

विवाहितेने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच चहामध्ये विष पाजून त्याला मृत्यूच्या स्वाधीन केले.

Love affair with lover wife killed her husband by mixing poison in tea murder open by video | बॉय़फ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली पत्नी; पतीला चहात दिलं विष; मृत्यूनंतर Video मुळे झाली पोलखोल

बॉय़फ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली पत्नी; पतीला चहात दिलं विष; मृत्यूनंतर Video मुळे झाली पोलखोल

googlenewsNext

प्रेमप्रकरणातून झालेल्या एका हत्येच्या घटनेने रेवा पोलीस चक्रावून गेले आहेत. जिथे प्रथम विवाहितेने आपल्या प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला आणि संधी मिळताच चहामध्ये विष पाजून त्याला मृत्यूच्या स्वाधीन केले. यामध्ये पतीचा मृत्यू झाला. महिलेने या प्रकरणाला आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र या घटनेशी संबंधित मृत शाहिद खानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण उलघडलं. 

मृत्यूपूर्वी शाहिदने पत्नी, तिचा प्रियकर आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ बनवला होता. या व्हिडिओनंतर सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकर आणि आईला अटक केली. या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनकर यांनी सांगितले की, पत्नीने प्रियकर आणि आई-वडिलांसोबत पतीला विष देऊन ठार केल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी सध्या सिव्हिल लाइन पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना वेळ लागला. यापूर्वी पोलीसही या प्रकरणाला आत्महत्या मानत होते. मात्र, मृताचे वडील सुरुवातीपासूनच हत्येची भीती व्यक्त करत होते. पीएम रिपोर्टमध्ये खुनाची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले.

नातेवाईकांनी केला होता हत्येचा आरोप 

पत्नीने प्रियकर आणि पालकांच्या संगनमताने मुलाची हत्या केल्याचा आरोप शाहिदच्या नातेवाईकांनी केला आहे. अशा स्थितीत पोलिसांनी सर्व संशयितांची कसून चौकशी केली. त्यानंतरच पोलिसांना यश आले असून आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. सध्या पत्नी, प्रियकर आणि आईला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तर वडील फरार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Love affair with lover wife killed her husband by mixing poison in tea murder open by video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.