Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:08 PM2021-06-05T17:08:38+5:302021-06-05T17:18:30+5:30

Crime News: तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Love breakup: Boyfriend in the army refuses to marry; woman took out Varat in UP | Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

Crime news: बॉयफ्रेंडने सैन्यात नोकरी लागताच दगा दिला, लग्नास नकार देताच तरुणीने 'वरात' काढली...

Next

अनेकांना आयुष्यात प्रेम मिळतेच असे नाही. कुटुंबीयांचा नकार, भांडणे, मारामाऱ्या, बळजबरी आदी कारणांनी प्रेमभंग होतो. अनेकदा लग्नाला गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडकडून नकार मिळतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडला आहे. तरुणीचा प्रियकर तिला धोका देऊन दुसऱ्याच मुलीशा लग्न करण्यासाठी निघाला होता. (Army jawan refused to marry with girlfriend.)


प्रियककर हा सैन्यात आहे. दोन वर्षांपूर्वी ही तरुणी तिच्या मावशीकडे संदीप मौर्य़ नावाच्या या तरुणाला भेटली होती. तरुणीने सांगितले की, त्याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध बनविण्यास भाग पाडले. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर त्याने संबंध तोडले. तरुणीच्या नातेवाईकांनी देखील हे खरे असल्याचे सांगितले आहे. त्या तरुणाने तिच्या आई-वडिलांशी लग्नाची बोलणी देखील केली होती. 


हा संदीप दुसऱ्या तरुणीशी लग्न करत होता. यावेळी तरुणीने त्याच्या घरासमोर आपली वरात नेली. जेव्हा प्रकरण तापले तेव्हा पोलीस तिथे पोहोचले आणि समजावले. तरुणीला समजावून तिने आणलेली वरात मागे पाठविली. तिने तिच्या बॉयफ्रेंडला लग्न न केल्यास आत्महत्येची धमकी दिली होती. त्याने सैन्यात नोकरी मिळाल्यावर तिला डच्चू दिल्याचा आरोप तिने केला आहे. 


पोलिसांतही FIR दाखल
तरुणाने तिला लग्नास नकार देताच तिने त्याच्या आणि कुटुंबाच्या विरोधात पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, संदीपला लग्न करण्यापासून रोखू शकत नाही. कारण ते त्याचे पहिलेच कायदेशीर लग्न असणार आहे. तरुणीला कायदेशीर दृष्टीनेच न्यायालयासमोर जाण्यास सांगितले आहे. 
 

Web Title: Love breakup: Boyfriend in the army refuses to marry; woman took out Varat in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.