लव्ह मॅरेजनंतर पहिली रात्र अन् नवऱ्याला समजलं बायकोचं धक्कादायक सत्य; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 09:05 PM2022-12-29T21:05:57+5:302022-12-29T21:06:27+5:30

सुखनंदन आरुषीला सोशल मीडियावर भेटला होता आणि तिथूनच त्याच्या प्रेमाची सुरुवात झाली.

love marriage social media cheating suhagraat husband know that his wife first night transgender haridwar | लव्ह मॅरेजनंतर पहिली रात्र अन् नवऱ्याला समजलं बायकोचं धक्कादायक सत्य; झालं असं काही...

लव्ह मॅरेजनंतर पहिली रात्र अन् नवऱ्याला समजलं बायकोचं धक्कादायक सत्य; झालं असं काही...

googlenewsNext

उत्तराखंडमधील लक्सरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाची मोठी फसवणूक झाली आहे. या तरुणाने हिसार येथील एका तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं होता. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याला कळलं की जिच्या प्रेमात तो इतके दिवस वेडा होता ती मुलगी मुलगीच नाही. त्याचं लग्न मुलीसोबत नाही तर एका ट्रान्सजेंडरसोबत झाल्याचं कळल्यावर तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली.

तरुणाने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण कोतवाली परिसरातील दर्गापूर गावातील असल्याची माहिती आहे. येथे राहणारा 30 वर्षीय सुखनंदन आरुषीला सोशल मीडियावर भेटला होता आणि तिथूनच त्याच्या प्रेमाची सुरुवात झाली. सोशल मीडियावर मैत्री झाल्यावर त्यांनी नंबर एक्सचेंज केले. त्यानंतर त्यांच्यातील संवाद वाढला. काही काळाने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी याबाबत आपआपल्या घरी सांगितले. 

दोघांचे कुटुंब एकमेकांना भेटले आणि २ एप्रिल रोजी लक्सरच्या राधाकृष्ण मंदिरात कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता त्यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर काही तासांनी एका अज्ञात व्यक्तीने सुखानंदन यांना सांगितले की, त्यांची पत्नी पूर्वी मुलगा होती आणि आता ऑपरेशननंतर ती मुलगी झाली आहे. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यावर त्याचा विश्वासच बसला नाही. याबाबत सुखानंदन हा पत्नीशी बोलायला गेला मात्र, तिने त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे तिच्या माहेरी निघून गेली.

पत्नीचं सत्य समोर आल्यानंतर सुखनंदन यांनी लक्सर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सुखनंदनने सांगितले की, त्याची पत्नी आरुषी हिचे नाव आधी आशू होते. ऑपरेशननंतर ती मुलगी झाली आहे. सुखनंदनने आरुषीच्या कुटुंबावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे आणि घटस्फोट देण्याच्या बदल्यात मोठ्या रकमेची मागणी केली आहे.

तरुणाच्या तक्रारीवरून 26 डिसेंबर 2022 रोजी आरुषी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध लक्सर कोतवाली येथे कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. याप्रकरणी इन्स्पेक्टर अमरजित सिंह यांनी सांगितले की, मुलीने लिंग बदलल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी डॉक्टरांचे जबाब नोंदवले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी आशुचे लिंग बदलले आहे. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, आरुषी आधी आशु होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: love marriage social media cheating suhagraat husband know that his wife first night transgender haridwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न