लव्हमॅरेज, चारित्र्यावर संशय, दीड वर्षांच्या मुलीलाही दूर ठेवलेले; मोबाईल चार्जिंगच्या केबलने गळा आवळून पत्नीचा खून
By सुनील पाटील | Published: October 1, 2022 09:08 PM2022-10-01T21:08:49+5:302022-10-01T21:09:23+5:30
सविता व जितेंद्र हे दाम्पत्य आठ दिवसापूर्वीच या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आले होते.
जळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन सविता जितेंद्र पाटील (वय २०) या महिलेचा पतीनेच मोबाईल चार्जिंग करण्याच्या कॉडने (वायर) गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर रस्त्यावरील खुबचंद साहित्या टॉवर ब्रम्हांडनायक अपार्टमेंट घडली.
जितेंद्र संजय पाटील (वय २५, रा.बांभोरी, ता.धरणगाव) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. खून केल्यानंतर जितेंद्र स्वत: पोलिसात हजर झाला.
सविता व जितेंद्र हे दाम्पत्य आठ दिवसापूर्वीच या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आले होते. दोघांचा प्रेमविवाह झालेला असून दीड वर्षाची मुलगी आहे. तिला दोघांनी सोबत आणले नव्हते. जितेंद्रच्या आई, वडिलांकडे ही मुलगी रहात होती. चारित्र्याच्या संशयावरुन खून केल्याची कबुली जितेंद्रने दिल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली.