'माझ्याशी प्रेम कर, नाहीतर मी मरेन', हातात चाकू घेऊन केला Video Call मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:29 PM2022-08-02T21:29:40+5:302022-08-02T21:39:39+5:30

Crime News : मुलीने नकार दिल्याने त्याने चाकू उचलला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली.

'Love me or I will die', made a video call with a knife in hand then... | 'माझ्याशी प्रेम कर, नाहीतर मी मरेन', हातात चाकू घेऊन केला Video Call मग...

'माझ्याशी प्रेम कर, नाहीतर मी मरेन', हातात चाकू घेऊन केला Video Call मग...

googlenewsNext

दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये एका वेड्या प्रियकराचे असे कृत्य समोर आले आहे, जे ऐकून पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने आधी तरुणीला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त केले. मुलीने नकार दिल्याने त्याने चाकू उचलला आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली.

तरुणीने घाबरून फोन कट केला आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. प्रकरण नोएडाच्या सेक्टर-39 चे आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरुणीने सांगितले की, मनोज नेपाळी नावाचा तरुण तिला अनेक दिवस फोन करून त्रास देत होता. त्याला तिच्याशी मैत्री करायची होती. पण मुलीला त्याच्याशी मैत्री करायची नव्हती. तिने मुलाचा नंबरही ब्लॉक केला.

पीडितेने सांगितले की, मनोज तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करू लागला. त्यानंतर एके दिवशी एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आल्यावर तरुणीने तो उचलला. फोन उचलताच मनोजने तिला प्रपोज करायला सुरुवात केली. मुलीने त्याला नकार दिल्याने त्याने चाकू उचलला. तेव्हा म्हणाला, माझ्याशी मैत्री कर, माझ्यावर प्रेम कर, नाहीतर हाताची नस कापून आत्महत्या करेन.

तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज नेपाळीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनोज हा नोएडातील आघापूरचा रहिवासी आहे. मुलीने अनेकवेळा शिवीगाळही केली होती. असे असूनही तो आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नव्हता.

 

Web Title: 'Love me or I will die', made a video call with a knife in hand then...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.