घटस्फोटित प्रेयसीसोबत प्रेम, सेक्स आणि फसवणूक..... नंतर हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 09:21 PM2022-05-03T21:21:04+5:302022-05-03T21:21:25+5:30
Love Sex And Murder : 48 तासांच्या आत मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
गाझियाबाद : बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे दिल्ली वाली गर्लफ्रेंड तुम्ही ऐकले असेलच. दिल्लीतील प्रेयसीची हत्या झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये प्रेमसंबंध आणि फसवणुकीचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 30 एप्रिल रोजी गाझियाबादच्या लोणी सीमा भागात मुलीचा मृतदेह एका गोणीत सापडला होता. मृताची ओळख पटू शकली नाही, यासाठी मारेकऱ्याने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी गुन्हा कुठे लपला आहे. 48 तासांच्या आत मारेकऱ्याला पोलिसांनीअटक केली असून या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
प्रेमप्रकरणाचा खेळ वर्षभरापूर्वी सुरू झाला
वास्तविक, प्रेमप्रकरणाचा खेळ सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झाला. जेव्हा दिल्लीत राहणाऱ्या संगीता हिचा पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती बुलंदशहर येथील रहिवासी रजनीशसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. दोघे गाझियाबादच्या लोणी भागात एकत्र राहू लागले. रजनीशचे संगीतावर खूप प्रेम होते, पण काही दिवसांपासून त्याला संगीतावर संशय होता. काही दिवसांनी ती दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचा आरोपीला संशय होता. त्यानंतर त्याने अतिशय चलाखीने संगीता यांचा गळा दाबून खून केला. त्याने संगीता यांचा मृतदेह गोणीत भरून दूरवर फेकून दिला. तो पकडला जाईल, अशी रजनीशला अपेक्षा नव्हती. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी तो संगीता यांचा टीव्ही आणि इतर सामान घेऊन पळून गेला, मात्र 48 तासांत पोलिसांनी रजनीशला अटक करून या खुनाचा पर्दाफाश केला.
एसपी ग्रामीण यांनी माहिती दिली
एसपी ग्रामीण गाझियाबाद डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, रजनीश आणि संगीता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. संगीता घटस्फोटित असून ती दिल्लीची होती. दोघांची भेट झाली, त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. काही दिवसांपासून रजनीशला संशय होता की, संगीता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असून त्याच्याशी लग्न करणार आहे. रजनीश संगीतावर खूप प्रेम करत होता. त्यानंतर रजनीशने ३० एप्रिल रोजी संगीताचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह गोणीत फेकून दिला. मात्र, पोलिसांनी ४८ तासांत आरोपीला अटक केली.