Crime News: लव्ह ट्रँगल! प्रेयसीसाठी मेडिकलच्या विद्यार्थ्याने दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या; दोन तासांत दोन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 21:59 IST2021-10-08T21:59:13+5:302021-10-08T21:59:31+5:30
Murder news gurgaon: दिल्लीच्या शेजारीच असलेले गुरुग्राम गोळीबारांच्या घटनांनी हादरले आहे. आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांना गोळी मारण्यात आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

Crime News: लव्ह ट्रँगल! प्रेयसीसाठी मेडिकलच्या विद्यार्थ्याने दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या; दोन तासांत दोन ठार
गुरुग्राम: दिल्लीच्या शेजारीच असलेले गुरुग्राम गोळीबारांच्या घटनांनी हादरले आहे. आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांना गोळी मारण्यात आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेडिकल विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला लव्ह ट्रँगलमधून गोळी मारली. तर दुसऱ्या घटनेत एका हॉटेलमध्ये बसलेल्या दोघांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
जमालपूरच्या धीरज हॉटेलमध्ये दोघे बसले होते. तेव्हा बलेनोमधून आलेल्या सहा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकाला दोन गोळ्या तर दुसऱ्याला एक गोळी लागली. दोन गोळ्या लागलेल्याचा मृत्यू झाला. याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे.
लव्ह ट्रँगलमधून दुसरी हत्या करण्यात आली आहे. गुरुग्रामची मेडिकल युनिव्हर्सिटी एसजीटीमधील ही घटना आहे. दिवसाढवळ्या युनिव्हर्सिटी परिसरात लव्ह ट्रँगलमधून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर गोळी झाडली. मेडिकलला चौथ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने लॉच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यावर कॅम्पसच्या पार्किंगमध्ये गोळी झाडली. उपचारादरम्यान लॉच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.