"आधी पार्टी एन्जॉय केली मग रील बनवलं अन् नंतर..."; लव्हस्टोरीचा 'असा' झाला भयंकर शेवट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:13 PM2023-01-14T12:13:39+5:302023-01-14T12:19:48+5:30
मघी बाईला चार मुलं असून मधा राम याला दोन मुले आहेत. पत्नी घरातून निघून गेल्यावर मधा राम त्याच्या प्रेयसीकडे पोहोचला.
राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारमेर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील आटी गावात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्यात आली आहे. दोघेही विवाहित असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोघांनाही मुले आहेत. मघी बाई आणि माधा राम असं या दोघांचं नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमप्रकरण सुरू होते. या संबंधांवर त्याच्या नातेवाईकांनी अनेकदा आक्षेप घेऊन त्याला समजावून सांगितले होते. पण मघी बाई आणि माधा राम यांनी कोणाचच ऐकलं नाही. प्रेम प्रकरणावरून दोघांच्या कुटुंबात वाद होत होता. मृताची पत्नी दोन दिवसांपूर्वी मुलांसह बाहेर गेली होती, असे सांगितले जात आहे.
मघी बाईला चार मुलं असून मधा राम याला दोन मुले आहेत. पत्नी घरातून निघून गेल्यावर मधा राम त्याच्या प्रेयसीकडे पोहोचला. तिथे दोघांनी आधी दारू पार्टी केली. मग दोघांनी रिल बनवलं. त्यानंतर मधा रामने ते आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलं. नंतर मृत्यूचा भयंकर मार्ग निवडून दोघांनीही गळफास घेऊन जीवन संपवलं.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याने घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे. या घटनेने दोघांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर बाडमेर जिल्हा मुख्यालयाच्या शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमार्टम करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"