प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 09:46 PM2021-12-14T21:46:56+5:302021-12-14T21:47:18+5:30

Lover deals with 2 nurses to abort girlfriend : अवैध संबंधांमुळे प्रेयसीला गरोदर केले आणि प्रियकराने ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करण्यासाठी सौदा केला. प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी तो नर्सच्या घरी पोहोचला.

Lover deals with 2 nurses to abort girlfriend, young woman dies | प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू

प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी प्रियकराने २ नर्ससोबत केला सौदा, तरुणीचा मृत्यू

googlenewsNext

हनुमानगड - राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे अवैध संबंधांमुळे प्रेयसीला गरोदर केले आणि प्रियकराने ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करण्यासाठी सौदा केला. प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी तो नर्सच्या घरी पोहोचला. गर्भपात करताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने प्रियकर घाबरला आणि त्याने प्रेयसीसह खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तिथेच तिचा मृत्यू झाला. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या परिचारिका आणि प्रियकराला पोलिसांनीअटक केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगड जिल्ह्यातील संगरिया येथील शाहपिनी गावात राहणारा अंकित कुमार (२२) याचे एका १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. नुकतीच मुलगी गरोदर राहिली. ही बाब लक्षात येताच अंकितने तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी हनुमानगढ शहरात राहणाऱ्या ममता या नर्सशी संपर्क साधला. दोघांमध्ये ३० हजार रुपयांमध्ये गर्भपात करून घेण्याचा सौदा ठरला.

८ डिसेंबरला गर्भपात झाला
त्यानंतर ८ डिसेंबरला अंकित त्याच्या गरोदर मैत्रिणीसोबत ममताच्या घरी पोहोचला. तिथे ममताने तिची सहकारी परिचारिका कविताला बोलावून गर्भपात करण्यात मदत केली. ममता हनुमानगड शहरातील वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये भाड्याच्या घरात राहते. तेथे दोघांनी मिळून मुलीचा गर्भपात केला. मात्र यादरम्यान मुलीला जास्त रक्तस्त्राव झाल्याने अंकित घाबरला.

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच दोन्ही परिचारिका फरार झाल्या
त्याने तिला हनुमानगनाड शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले आणि तेथे तिला दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच दोन्ही परिचारिकांनी तेथून पळ काढला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता अंकितने ती मुलगी रस्त्यावर पडलेली दिसली आणि उपचारासाठी आणल्याचा बतावणी केली. 


नर्स आणि प्रियकर अंकित या दोघांना अटक
दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी ९ डिसेंबर रोजी मृत मुलीच्या वडिलांनी अंकितविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांनाही त्याच्यावर संशय आला. तपासाअंती पोलिसांनी सोमवारी अंकितला पकडले आणि त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने संपूर्ण सत्याचा पर्दाफाश केला. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या ममता आणि कविता या दोन्ही परिचारिकांनाही नगर पोलिसांनी अटक केली आहे.

ममता आणि कविता यांनी अनेक अवैध गर्भपात केले आहेत
शहर पोलीस दोन्ही परिचारिकांची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी आतापर्यंत आणखी किती बेकायदेशीर गर्भपात केले आहेत, याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या टोळीतील इतर कोण आहेत? प्राथमिक तपासाअंती ममता आणि कविता यांनी मिळून भाड्याच्या घरात राहून इतर अनेक तरुणी व महिलांचे अवैध गर्भपात केल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याच्या तपासात गुंतले आहेत.

Web Title: Lover deals with 2 nurses to abort girlfriend, young woman dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.