लग्नानंतर प्रेयसीच्या सासरी गेला प्रियकर, घरातून तिला पळवून नेलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 05:40 PM2023-06-08T17:40:13+5:302023-06-08T17:41:22+5:30
Crime News : गावातील लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली आणि पोलिसांनी नंतर चौकशी केली. मृत तरूणी बेलामेघ गावात राहणाऱ्या अजय पासवानची पत्नी उजाला होती.
Crime News : बिहारच्या एका तरूणाने त्याच्या विवाहित प्रेयासीला पळवून नेलं आणि नंतर तिची हत्या केली. हत्येची ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता तरूणीचा मृतदेह चौरमधून आढळून आला. मृतदेह सापडल्यावर याची माहिती लगेच गावात पसरली आणि लोकांची मोठी गर्दी जमा झाली. आधी तर मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पण नंतर तिची ओळख पटली.
गावातील लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली आणि पोलिसांनी नंतर चौकशी केली. मृत तरूणी बेलामेघ गावात राहणाऱ्या अजय पासवानची पत्नी उजाला होती. घटनेच्या संदर्भात मृत तरूणीचा पती अजय पासवान याने सांगितलं की, त्यांचं लग्न तीन महिन्यांआधीच झालं होतं. तो मजुरी करून कसंतरी आपल्या परिवाराचं पोट भरत होता. त्याने सांगितलं की, गावातीलच एक तरूण नीतीश कुमारसोबत त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते.
गेल्या सोमवारी सकाळी त्याच्या पत्नीला नीतीश कुमार पळवून घेऊन गेला. हे त्याला समजल्यावर तो नीतीश कुमार याच्याकडे गेला होता आणि तिथे जाऊन त्याने त्याच्या पत्नीला सोडण्याची विनंती नीतीशकडे केली. त्या बदल्यात अजयने त्याला काही पैसेही देण्याचं आमिष दाखवलं. पण नीतीशने पत्नीला न सोडता अजयला धमकी दिली. धमकी ऐकल्यावर घाबरून अजय तिथून निघूना आला. त्यानंतर नीतीश कुमारने फोन करून उजालाचं पतीसोबत बोलणं करून दिलं. ती म्हणाली की, दलसिंहसराय इथे ये.
रात्री साधारण 9 वाजता त्यांचं बोलणं झालं होतं आणि सकाळी तिचा मृतदेह सापडल्याची सूचना मिळाली. मृतदेहाची सूचना मिळताच परिवारातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची ओळख पटवली. नीतीश कुमारने उजालाला पळवून नेल्याचं तिच्या वडिलांनीही सांगितलं. ते म्हणाले की, त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं की, नीतीश कुमार एका तरूणाच्या मदतीने त्यांच्या मुलीला पळवून घेऊन गेला होता. उजालाचा पती म्हणाला की, तिच्यासोबतच चुकीचं करून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह फेकून दिला.
या घटनेमुळे सगळ्यांना धक्का बसला. सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की, जो नीतीश कुमार उजालावर इतकं प्रेम करत होता त्याने तिला घरातून पळून नेऊन तिची हत्या कशी केली? घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं की, दोन-तीन दिवसांपासून तरूणी बेपत्ता होती. परिवारातील लोक तिचा शोध घेत होते. याची माहिती पोलिसांना दिली गेली नव्हती. आता पुढील कारवाई सुरू आहे.